school sakal
पुणे

Pune School : पानशेतमध्ये साकारतेय झेडपीची क्लस्टर स्कूल,सोळा शाळांचे एकत्रीकरण;राज्यातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प

यासाठी पुणे जिल्हा परिषदेने एक चांगला पर्याय शोधून काढला आहे. हा पर्याय म्हणजे कमी पटाच्या शाळा बंद नव्हे तर, त्यांचे एकत्रीकरण करायचे, असा हा नवा पर्याय आहे. यालाच क्लस्टर स्कूल (समूह शाळा) असे नाव देण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील कमी पटसंख्येच्या सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरु करताच, या संभाव्य निर्णयाला कडाडून विरोध करण्याची भूमिका शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी जाहीर केली होती. परंतु कमी पटाच्या शाळा बंदही करायचा आणि त्या बंद होण्यापूर्वीच त्यांना विरोध होऊ नये,

यासाठी पुणे जिल्हा परिषदेने एक चांगला पर्याय शोधून काढला आहे. हा पर्याय म्हणजे कमी पटाच्या शाळा बंद नव्हे तर, त्यांचे एकत्रीकरण करायचे, असा हा नवा पर्याय आहे. यालाच क्लस्टर स्कूल (समूह शाळा) असे नाव देण्यात आले आहे.

यानुसार झेडपीची राज्यातील पहिली क्लस्टर स्कूल ही पुणे जिल्ह्यातील पानशेत (ता. वेल्हे) येथे साकारत आहे. अशा पद्धतीचा हा राज्यातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प असणार आहे.

यासाठी पानशेत व पानशेतच्या परिसरातील किमान २० च्या आत पटसंख्या असलेल्या सोळा जिल्हा परिषद शाळा निवडण्यात आल्या आहेत. या शाळेसाठी पानशेतमध्ये मोठी इमारत उभारण्यात आली आहे.

येत्या शैक्षणिक वर्षापासून (जून २०२३) ही शाळा सुरु होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जास्त मुलांसोबत शिक्षण घेण्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठीही मदत होणार आहे. सध्या या शाळांमधील पटसंख्या खुपच कमी असल्याने दोन शिक्षकांच्या नियुक्तीवर शाळा चालवली जाते. परिणामी एकाच वर्गखोलीत विविध वर्गातील विद्यार्थी एकत्र बसून शिक्षण घेत आहेत.

पानशेतमध्ये उभारण्यात आलेल्या या क्लस्टर स्कूलमध्ये मात्र आता प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्याच वर्गातील विद्यार्थ्यांसोबत बसून शिक्षण घेता येणार आहे. यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर फंड) अद्ययावत अशी नवीन इमारत बांधण्यात आले आहे. सध्या या १६ शाळांमध्ये मिळून एकूण ३७ शिक्षक कार्यरत आहेत. शाळा एकत्रीकरणातून आता केवळ ९ शिक्षकांची गरज भासणार आहे. परंतु विविध विषयांचे तज्ज्ञ असलेल्या १२ शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना बसची सोय

दरम्यान, पानशेतच्या आजूबाजूच्या परिसरातील गावे आणि वाड्या-वस्त्यांमधील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेणार आहेत. यासाठी आजूबाजूच्या गावातून शाळेत येण्यासाठी आणि परत घरी जाण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी बसची सोय करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना सरकारी निधीच्या माध्यमातून बसची सोय उपलब्ध करून देणारी पानशेत ही राज्यातील एकमेव शाळा ठरणार आहे.

यासाठी फोर्स मोटर्सने दोन बस दिल्या आहेत. त्यातील एक बस जिल्हा परिषदेच्या मालकीची असेल, तर दुसरी बस स्थानिक चालकाला चालविण्यासाठी दिली जाणार आहे. दरम्यान, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दोन किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापावे लागत असल्यास, अशा विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता म्हणून प्रतिवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. हेच अनुदान आता या बसचालकाला प्रत्येक विद्यार्थ्यांपोटी दिले जाणार आहे.

शाळेसाठी सुसज्ज नवी इमारत

या क्लस्टर स्कूलसाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ८ प्रशस्त वर्गखोल्या बांधण्यात आलेल्या आहेत. याशिवाय प्रत्येक वर्गात संगणक, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रम प्रयोगशाळा व एक ई वर्गखोली तयार कऱण्यात आलेली आहे.

इमारतीत आणखी चार खोल्या असणार आहेत. अशी एकूण बारा वर्गखोल्यांची ही नवी शाळा असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

या क्लस्टर स्कूलचा सुरवातीला पालकांसह शिक्षकांचाही विरोध होता. परंतु, याचे फायदे समजाऊन सांगितल्यानंतर सर्वांनी एकमताने सहमती दिली. त्यानुसार १२ वर्गखोल्यांची ही नवी इमारत उभारण्याचे ठरले.

पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जागेवरच ही नवीन शाळा इमारत बांधण्यात आली आहे. यासाठी जानकीदेवी बजाज फाउंडेशनने सव्वा कोटी रुपयांचा निधी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उपलब्ध करून दिला आहे.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी

झेडपी शाळांची सद्यःस्थिती

  • झेडपीच्या एकूण शाळा --- ३७१६

  • वीसच्या आत पटसंख्येच्या शाळा --- १०५४

  • वीसच्या आत पटसंख्येच्या शाळांतील एकूण विद्यार्थी --- १२, ८९८

  • वीसच्या आत पटसंख्येच्या शाळांतील शिक्षकांची संख्या --- १८६४

  • पानशेतच्या क्लस्टर स्कूलमधील संभाव्य विद्यार्थी संख्या --- १५४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT