Shyam Deshpande News
Shyam Deshpande News  Sakal
पुणे

मुख्यमंत्र्यांची RSS वर टीका; पुण्यातील नाराज शिवसेना नेत्याचा पक्षाला रामराम

सकाळ डिजिटल टीम

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नुकतीच मुंबईतील बीकेसी मैदानावर जाहीर सभा पार पडली. यामध्ये त्यांनी भाजपसह (BJP) अनेकांवर जोरदार हल्लाबोल करत समाचार घेतला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरदेखील (RSS) टीका केली होती. परंतु, संघ परिवारावर केलेल्या टीकेमुळे शिवसेनेतील एक नेते नाराज झाले असून, त्यांनी थेट शिवसेनेला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे पुण्यातील नेते आणि माजी शहरप्रमुख शाम देशपांडे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. याबाबत देशपांडे यांनी पत्रक काढून महिती दिली आहे. (Shivsena Leader Sham Deshpande Quit Party)

देशपांडे यांनी काढलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, भाजपाच्या पूर्वीही संघ होता. संघाला राजकारणात ओढण्याची गरज नव्हती असे आपले प्रामाणिक मत असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे. संघाला राजकारणात ओढून उद्धव ठाकरेंनी बेगडी धर्मनिरपेक्षतावाद्याचा पदर घट्ट धरला असल्याची आपली भावना असल्याचे देशपांडेंनी म्हटले आहे. संघाच्या हिंदुत्वाला आक्रमकतेची योग्य दिशा हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिली. आज आरएसएसवर टीका करून ती दिशा भरकटली आहे. त्यामुळे मी शिवसेना पक्षाचे काम थांबवत असल्याचे शाम देशपांडे यांनी पत्रकात म्हटले आहे. (Shyam Deshpande News)

शिवसेनेकडून प्रतिक्रिया

दरम्यान, आगामी काळात पुणे महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. त्याआधी शाम देशपांडे यांनी पक्षाला रामराम केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या सर्वामध्ये आता शिवसेनेने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी देशपांडे पक्षातून गेल्याने काडीचाही फरक पडत नसल्याचे म्हटले आहे. शिवसेना ही संघटना निष्ठावंतांची असून, देशपांडेंना तीन वेळा महापालिकेत संधी देण्यात आली. स्थायी समितीचं अध्यक्षपद, गटनेता, शहरप्रमुख ही पदे आणि विधानसभेची उमेदवारी देऊनही ते समाधानी नव्हते असे शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे (Gajanan Tharkude) म्हणाले. देशपांडेंनी कृतज्ञपणा दाखवण्याऐवजी कृतघ्नपणा दाखवल्याचेही थरगुडे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT