Pune corporation Sakal
पुणे

पुणे : शिवनेरी रस्त्यावर अतिक्रमण कारवाई; सात ट्रक माल जप्त

बाजार समिती, महापालिका, पोलिसांची संयुक्त कारवाई

प्रविण डोके

पुणे : मार्केटयार्डातील (Market Yard) अत्यंत महत्त्वाचा रस्ता म्हणून शिवनेरी (Shivneri) रस्त्याची ओळख आहे. मात्र या रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण झाल्याने मोठी वाहतूक कोंडी (Traffic) होत होती. त्याचा बाजारावर परिणाम होत असल्याने गुरुवारी बाजार समिती, महापालिका (Pune Corporation), पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. यामध्ये सात ट्रक माल जप्त करण्यात आला आहे.

मार्केटयार्डातील विविध विभागात माल घेऊन येणारी वाहने शिवनेरी रस्त्याने ये-जा करतात. परिसरात वास्तव्याला असणारे नागरिकांची वाहने तसेच शहरातून खरेदीला येणारी वाहनेही याच रस्त्याने ये-जा करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहनाचा मोठा ताण आहे. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा हातगाडीवाले, टपर्‍या, फळे व भाजीपाला विक्रेत्यांचा विळखा वाढला आहे. या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे हा रस्ता कायमच वाहतूक कोंडीत हरवलेला असतो. वाहतूक कोंडीला अतिक्रमण हेच मुख्य कारण असल्याने शिवनेरी रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार बाजार समिती प्रशासनाने केला आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड पोलीस, वाहतूक पोलिस व महापालिकेचा अतिक्रमण विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये बाजार समितीचे २०-२५ अधिकारी, महापालिकेचे ४०+३५ अधिकारी कर्मचारी, पंधरा सुरक्षा रक्षक, १५- २० पोलिसांचा फौजफाटा कारवाईसाठी तैनात असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.

अतिक्रमण धारकांचा गोंधळ

अतिक्रमण कारवाई केल्याने या रस्त्यावरील अतिक्रमण धारक विक्रेत्यांनी मार्केट यार्ड मुख्य गेट समोर आंदोलन केले. तसेच शिवनेरी रस्ता आडवून धरत मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला. त्यामुळे काहीकाळ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी सर्वांना रस्त्याच्या बाजूला करत शिवनेरी रस्ता मोकळा करून दिला.

मार्केट यार्डाच्या दृष्टीने हा रस्ता खूप महत्वाचा आहे. त्यामुळे शिवनेरी रस्ता कायमचाच अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आता दररोज सात्यात्याने कारवाई केली जाणार आहे. यासाठी दोन शिफ्टमध्ये या रस्त्यावर कर्मचारी तैनात असणार आहेत.

- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT