Shivsena Sakal
पुणे

पुण्यात शिवसेना फुटली; वरिष्ठ पदाधिकारी शिंदेंच्या गटात जाणार

एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यातील शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्र वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख एकनाथ शिंदेंच्या गटात जाणार आहेत.

(Eknath Shinde News)

शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि राजाभाऊ भिलारे हे एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान भिलारे यांच्या कार्यालयावर सकाळी १० ते १५ शिवसैनिकांनी हल्ला केला होता. राजाभाऊ भिलारे हे सदाशिव पेठेतील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामध्ये कार्यरत आहे. त्यांच्या कार्यालयावर असणाऱ्या एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, मंगेश चिवटे यांच्या फोटोला सकाळी शिवसैनिकांनी काळे फासले आहे.

या सगळ्या घटनानंतर शिवसेनला मोठा फटका बसला आहे. पुण्यासहित मुंबईतही अनेक ठिकाणी शिवसैनिकांकडून घोषणाबाजी केली जात आहे. तसेच एकनाथ शिंदे गटाविरोधात तोडफोड आणि निदर्शने केले जात आहेत. त्यामुळे आता शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा वाद शिगेला पोहोचला आहे. दरम्यान बंडखोर १६ आमदारांवर निलंबनाची मागणी केली असून त्यांना नोटिसा पाठवल्या जाणार आहेत.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार घेऊन सध्या गुवाहटीमध्ये आहेत. त्यांनी शिवसेनेशी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आता धोक्यात आलं आहे. सरकारकडून वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असून शिंदे गट भाजपासोबत जाणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारणाला कोणती दिशा मिळणार हे पहावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : पुणे जिल्ह्यात नराधमाचा अमानुषपणा! चिमुरडीच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; आरोपीला मिळणार मृत्यूदंडाची शिक्षा?

Latest Marathi News Live Update : बच्चू कडू प्रकरणावर प्रा. ज्योती वाघमारे यांचा उबाठावर जोरदार पलटवार

IPL 2026: वैभव सुर्यवंशीला खतरनाक लूक देणाऱ्या जेमिन्सला शिक्षा! BCCI ची कारवाई

Mumbai: एक्स्टॅसी पुरवणारा खेमलानी अटकेत, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांची कारवाई

Bargi Dam Accident: क्रूझ कापून वाचवले जीव! मृतांच्या कुटुंबीयांना भेटून मुख्यमंत्री भावूक, बरगी धरण अपघातावर कठोर कारवाईची तयारी

SCROLL FOR NEXT