A municipal truck submerged in a 25-foot deep sinkhole near Pune’s City Post Office at Budhwar Peth. esakal
पुणे

Pune Sinkhole Incident: पुण्यात सिंकहोलने ट्रक का गिळला? पेशवेकालीन संदर्भ आला समोर

Uncover the History Behind the Sinkhole That Swallowed a Truck in Pune: संपूर्ण घटना ही पुण्यातील चुकीच्या पद्धतीने बुजवलेल्या पुरातन विहिरींशी निगडित असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की, शहराच्या आधुनिक विकासासह त्याच्या ऐतिहासिक वारशाचा योग्य विचार होणे अत्यावश्यक आहे.

Sandip Kapde

पुणे: मागील आठवड्यात पुणे महानगरपालिकेच्या एका ट्रकचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा ट्रक एका सिंकहोलमध्ये समाविष्ट झाला होता. ही घटना पुण्यातील बुधवार पेठेतील समाधन चौकाजवळील सिटी पोस्ट ऑफिसच्या पार्किंगमध्ये घडली. या अपघाताने पुणेकरांच्या मनात विशेषतः शहराच्या ऐतिहासिक पाश्र्वभूमीचा विचार करता अनेक प्रश्न निर्माण केले.

या सिंकहोलचे मोजमाप अंदाजे २५ फूट खोल होते. या घटनेनंतर लगेचच पुणे महापालिकेची अग्निशमन सेवा घटनास्थळी पोहोचली. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले की, एका सामान्य पार्किंगच्या जागेत पक्क्या फरशा असलेल्या जमिनीवर एवढा मोठा खड्डा कसा निर्माण झाला?

या अपघातानंतर अनेक इतिहासप्रेमींनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली. पुण्यातील इतिहास प्रेमी आणि हेरिटेज तज्ज्ञ संदीप गोडबोले यांनी एक्स सोशल मीडियावर वर एक जुना नकाशा शेअर केला. या नकाशावर १८०० च्या दशकात समाधन चौकाजवळ एक गोलाकार विहीर दर्शवलेली होती. त्यावेळी लक्ष्मी रोड अस्तित्वात नव्हता. गोडबोले यांनी म्हटले की, "हे सिंकहोल त्या जुन्या विहिरीमुळेच निर्माण झाले असावे."

पुढे १९६० च्या दशकातील नकाशा दाखवतो की, लक्ष्मी रोड आणि सिटी पोस्ट ऑफिस असले तरी विहिरीचे कोणतेही चिन्ह नव्हते. यावरून असे दिसून येते की, १८०० ते १९६० च्या दरम्यान ही विहीर बंद करण्यात आली असावी, परंतु ती नीट बंद न झाल्यामुळे सिंकहोलचा त्रास उद्भवला असावा.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसलेंनीही या मताला दुजोरा दिला. त्यांनी म्हटले की, "घटनास्थळी तपास करताना जुन्या विहिरीचे काही चिन्ह आढळले आहेत, आणि या विहिरीचे अवशेष या सिंकहोलसाठी कारणीभूत असू शकतात."

जुनी वास्तू आणि आधुनिक बांधकाम-

पुण्यातील रस्त्यांचे बांधकाम करताना ऐतिहासिक वास्तूंचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतात हजारो वर्षांची संस्कृती आहे, आणि नवीन बांधकाम करताना किमान २०० वर्षांचा इतिहास तपासावा लागतो. विशेषतः जुन्या वसाहतींच्या जागेवर आधुनिक बांधकाम करताना जुन्या विहिरी, तलाव किंवा भूमिगत मार्गांचा विचार न केल्यास अशा घटना वारंवार होऊ शकतात.

पुढील उपाययोजना-

सिंकहोलच्या धक्कादायक घटनेमुळे आता महापालिकेकडून शहरातील जुन्या नकाशांचा अभ्यास करून तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT