Pune_Smart_City 
पुणे

... म्हणून ९७ टक्के शहराने घेतला मोकळा श्‍वास; काय आहे 'स्मार्ट सिटीचा स्मार्ट फंडा?'

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तब्बल 68 दिवसांच्या लॉकडाउननंतर शहरातील 97 टक्के भागातील नागरिकांना मोकळा श्‍वास घेता आला. कारण, वस्ती स्तरावरील मायक्रोकंटेन्मेंट झोन तयार करणे शक्‍य झाले, ते केवळ पुणे स्मार्ट सिटीच्या डॅशबोर्डमुळे! प्रशासनाची निर्णयातील जलद गती आणि अचूकताही यामुळे वाढली आहे. 

सुरवातीला क्षेत्रीय स्तरावरील कोरोनाग्रस्तांच्या माहितीच्या आधारे विश्‍लेषण होत. पण आता प्रभागस्तर आणि वस्ती स्तरावरील कोरोनाग्रस्तांची इत्थंभूत माहिती आणि विश्‍लेषण पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे आहे, अशी महिती जनसंपर्क अधिकारी संग्राम जगताप यांनी दिली.

शहरातील कोविड उपचारासाठीचे रुग्णालये, त्यांच्यात उपलब्ध खाटांची संख्या, व्हेंटिलेटरची स्थिती अशा सर्व माहितीसह भविष्यात लागणारी गरजही स्मार्ट सिटीच्या डॅशबोर्डमुळे स्पष्ट झाली आहे. महापालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पुणे स्मार्ट सिटीच्या कार्यपद्धतीमुळे कोविड विरोधातील वॉररूम तर तयार झाली आहेत. पण, भविष्यातील संसर्गजन्य आजारांविरूद्धची 'रणनिती'ही आखली गेली आहे. 

स्मार्ट डॅशबोर्ड : 
- संपूर्ण शहराची कोरोनाबाबतची माहिती एकाच स्क्रीनवर 
- महापालिका आणि आरोग्य विभागाकडून आलेली कोविड संदर्भातील माहितीचे संकलित प्रारूप 
- रूग्णालयांकडील कोरोना संदर्भातील आकडेवारी आणि इतर माहितीचे संकलन 
- उपलब्ध माहितीचे आवश्‍यकतेनुसार पृत्थक्करण आणि त्याआधारे निर्णय 
- भविष्यातील उपाययोजनांसाठी माहितीवर संशोधन आणि मॉडेल विकसित

या माहितीचे झाले संकलन 
1) महापालिका : 
- सुरवातीच्या काळात एक हजारांच्यावर गटांनी शहरात कोरोनाचे सर्वेक्षण. 
- घशातील द्रव पदार्थाचे संकलन, त्यातील बाधितांचे दर. 
- बाधित रुग्णांचे राहण्याचे ठिकाण, वय, उपचाराचे ठिकाण आदी. 
- बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी आणि रुग्णांचा शोध. 
- विलगीकरण कक्षातील लोकांची संख्या. 

2) आरोग्य विभाग : 
- रुग्णालयांची संख्या, उपलब्ध खाटा, व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन खाटा आदी. 
- विलगिकरणासाठीच्या खाटा, वाढीव क्षमता. 
- कोणत्या रुग्णावर कोठे उपचार, डिस्चार्ज केंव्हा झाला, शिल्लक बेड. 
- कोविड आणि नॉन कोविड रूग्णवाहिका, पीएमपी बसेस आणि इतर वाहतूक व्यवस्था. 
- कॉंटेक्‍ट ट्रेसिंग, रुग्णांची संख्या, अतिदक्षता विभागातील रुग्ण आदी. 

असा झाला फायदा : 
- मायक्रो कंटेन्मेंट झोनची निश्‍चिती आणि लक्ष ठेवता आले. 
- वर्तमान आकडेवारीच्या आधारे आरोग्य सेवांचे व्यवस्थापन. 
- निर्णयांची वेळ, अचूकता आणि परिणामकारकता वाढली. 
- उपलब्ध माहितीच्या विश्‍लेषणातून पुढील 30 दिवसांतील आवश्‍यकतेचा अंदाज. 
- आरोग्य कर्मचारी, पोलिस, महापालिका कर्मचारी आदींच्या कामाची परिणामकारकता वाढली. 
- कोविड योद्‌ध्यांसह नागरिकांमधील भीती आणि तणाव कमी करता आला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटरचा कोरोनाच्या उपाययोजनांसाठी चांगला उपयोग होत आहे. डॅशबोर्ड आणि आधुनिक तंत्रनाचा वापर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांचा आढावा घेता येतो.'' 
- रूबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT