pune
pune sakal
पुणे

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; एक ठार तर तीन जखमी

कृष्णकांत कोबल

हडपसर : येथील पुणे-सोलापूर महामार्गावर अमरबाग परिसरात टँकर पलटी होऊन भीषण अपघात झाला. अपघातामध्ये एकजण जागीच ठार झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत. आज पाहटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रणजीत माणिक जाधव (रा. मुंढवा) असे मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने अँश घेऊन टँकर भरधाव वेगाने येत होता. आकाशवाणी केंद्राजवळील रविदर्शन चौक ओलांडून हा टँकर अमरबाग सोसायटीसमोर आला असता समोरून उलट दिशेने येणाऱ्या दुचाकीला वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नात चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने टँकर एका कारसह तीन रिक्षांना धडक पुढे गेला. त्यानंतर टँकर रस्त्याशेजारील झाडावर जोरदार धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की हे झाडही या धडकेत तुटून एका रिक्षावर पडले आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, महामार्गावर सुमारे दोन किलोमीटर वाहतूक कोंडी झाली होती.

घटनास्थळी पोलिस, अग्निशामक दलाचे कर्मचारी, जीवरक्षक बच्चूसिंग टाक, प्रशांत सुरसे, सुनील बनकर यांच्यासह आसपासच्या नागरिकांनी बचाव कार्य केले. क्रेनच्या साह्याने कंटेनर बाजूला हटविले आहे. जखमींना खाजगी रुगालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT