ST Bus
ST Bus Sakal
पुणे

पुणे : एसटीसेवा अद्यापही विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी ८ नोव्हेंबरपासून पुणे विभागातील १३ आगारांतील एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत.

पुणे - राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) (ST) पुणे विभागातील कर्मचाऱ्यांचा संप (Strike) गेल्या दोन महिन्यांपासून सुरूच आहे. त्यामुळे पुणे विभागातील (Pune Department) १३ आगारांपैकी एकूण आठ आगार विभागाला सुरू करता आले आहेत. पश्चिम महाराष्ट्र सोडता, इतर भागात पुणे विभागातून एसटी सुरूच झाली नाही. त्यामुळे एसटीची वाहतूकसेवा (Transport Service) अद्यापही विस्कळीत आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी ८ नोव्हेंबरपासून पुणे विभागातील १३ आगारांतील एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. राज्य सरकारने संप मिटविण्यासाठी अनेक मार्ग काढले. मात्र, सरकाला अद्याप संप मिटविण्यात यश आले नाही. परिवहन मंत्र्यांनी मेस्मा कायद्याचा धाक दाखविला. तसेच, जे कर्मचारी कामावर हजर होतील, त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली जाईल, असे आवाहन केले होते. याला अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र, जे कर्मचारी कामावर हजर झाले, त्यांच्या आधारावर एसटीने स्वारगेट, शिवाजी नगर, पिंपरी-चिंचवड, बारामती, दौंड, इंदापूर, भोर, एमआयडीसी या आठ आगारांतून ४० मार्गांवर एसटीची सेवा सुरू केली आहे. या मार्गावरून एसटीला आतापर्यंत केवळ २९ लाख रुपये एवढे उत्पन्न मिळवता आले आहे.

पुण्यातून खानदेश (उत्तर महाराष्ट्र), मराठवाडा, विदर्भ या भागात जाणाऱ्या प्रवाशांना अद्याप लालपरीची प्रतीक्षा आहे. या मार्गावर काही अडचण आल्यास एसटी विभागाला संपर्क साधावा. तसेच, ०२०/२४४४७१५२ या क्रमांकावर चौकशी करावी.

कर्मचाऱ्यांअभावी पश्चिम महाराष्ट्र सोडता, इतर मार्गांवर एसटी बससेवा सुरू करण्यास मर्यादा येत आहेत. काही दिवसांत मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर हजर होतील. त्यानुसार गर्दीच्या आणि लांबच्या मार्गांवर बससेवा सुरू केली जाईल.

- ज्ञानेश्‍वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी विभाग, पुणे

सुरू असलेली बससेवा

  • शिवशाही - ६०

  • शिवनेरी - २५

  • साधी गाडी - ७०

  • ४० मार्गांवर एकूण - १५५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT