Sasoon Hospital building Sakal
पुणे

Pune Crime : ससूनच्या इमारतीवरून पडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

ससून रुग्णालयातील इमारतीच्या छतावरून पडल्यामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २९) घडली.

सकाळ वृत्तसेवा

ससून रुग्णालयातील इमारतीच्या छतावरून पडल्यामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २९) घडली.

पुणे - ससून रुग्णालयातील इमारतीच्या छतावरून पडल्यामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २९) घडली. ही तरुणी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती.

आदिती दलभंजन (वय २०, रा. सिंहगड रस्ता) असे मृत तरुणीचे नाव आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिती ही एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकत होती. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आदिती ससून रुग्णालयातील जुन्या इमारतीच्या छतावर गेली. तेथून खाली पडल्यामुळे डोक्याला मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली होती.

आदितीला तातडीने उपचारासाठी आपत्कालीन विभागात हलविण्यात आले. सर्व स्पेशालिटी डॉक्टरकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दरम्यान, बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी सातपुते यांनी घटनास्थळी भेट दिली. तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल ताब्यात घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT