महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या परिक्षा देण्याचे तिने ठरविले. त्यानुसार तयारीही सुरु केली.  
पुणे

Pune: मस्त ग पोरी, विपरीत परिस्थीतीत महापालिकेच्या शाळेत शिकली अन् झाली फौजदार

Success Story: कात्रजच्या निकिताचे पीएसआय परिक्षेत यश; भावाचे मार्गदर्शन आले कामी

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

Katraj: वडील सैन्यामध्ये असल्याने वडिलांच्या अंगावरील खादी पाहून वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत फौजदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगून कात्रजच्या निकिता पाचांगणे हिने ते पूर्ण केले आहे. महापालिकेच्या शाळेत शिकणारी निकिता फौजदार झाल्याने कात्रज परिसरातून तिचे कौतुक होत आहे.

वडिलांप्रमाणे निकीताचेही वर्दीवर प्रेम होते म्हणूनच काहीतरी करून आपण आपली ओळख व अस्तित्व निर्माण करायचं ठरवलं आणि महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या परिक्षा देण्याचे तिने ठरविले. त्यानुसार तयारीही सुरु केली.

प्राथमिक शिक्षण कात्रजच्या महापालिकेच्या शाळेत, माध्यमिक शिक्षण महापालिकेच्या शुक्रवार पेठेतील शाळेत तर आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून विज्ञान शाखेत तिने पदवी मिळविली. त्यानंतर स्पर्धा परिक्षांची तयारी सुरु केली. २०२०मध्ये तिला अपयश आले.

परंतु, जिद्द न हारता व मनोधैर्य खचू न देता तिने अभ्यास सुरु ठेवला. २०२१ला पूर्व परीक्षा दिली व त्यात ती पास झाली. परंतु, मुख्य परीक्षेत तिला अपयश आले. २०२२मध्ये राज्यसेवा व पीएसआय (पोलिस उपनिरिक्षक) दोन्ही पूर्व परीक्षांत तिला घवघवीत यश मिळाले.

निकीताचे वडील जालिंदर पाचांगणे यांनी अर्थिक चणचण कधी भासू दिली नाही. तर, भाऊ वैभव पाचांगणे शिक्षक असल्याने त्यांनी तिला मोलाचे मार्गदर्शन केले. आई पद्मावती पाचांगणे यांनी घरची जबाबदारी कधी येऊ दिली नाही.

स्वतःला सिद्ध करण्यासाठी मानसिकरीत्या स्थिर राहण्याची तिची खरी धडपड होती. मित्रमैत्रिणी, सोशल मीडियाच्या दूनियेतून बाहेर पडून पुस्तकांशी घट्ट मैत्री करून सतत त्यांच्यासोबत राहणे हे तिच्यासमोर मुख्य आव्हान होते आणि ते लिलया पेलत फौजदार पदाला गवसणी घातली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT