suresh-prabhu sakal
पुणे

Suresh Prabhu : बड्या बँकांना आणखी मोठे करण्यापेक्षा लहान बँकांचे सक्षमीकरण व्हावे

‘भगिनी निवेदिता सहकारी बँके’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षारंभानिमित्त कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या (सीओईपी) सभागृहात आयोजित कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

‘भगिनी निवेदिता सहकारी बँके’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षारंभानिमित्त कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या (सीओईपी) सभागृहात आयोजित कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू बोलत होते.

पुणे - ‘जगातील काही मोठ्या बँका बुडत असून, त्यांना वाचविण्यासाठी सरकारला करदात्यांचे पैसे वापरावे लागतात. त्यामुळे बड्या बँकांना आणखी मोठे करण्यापेक्षा लहान सहकारी बँकांचे सक्षमीकरण केल्यास त्या यशस्वी ठरतील. राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे तंत्रज्ञान, व्यवस्थापन आदी संसाधने छोट्या सहकारी बँकांना उपलब्ध करून दिली पाहिजेत,’ असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.

‘भगिनी निवेदिता सहकारी बँके’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षारंभानिमित्त कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या (सीओईपी) सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे, बँकेच्या अध्यक्षा डॉ. रेवती पैठणकर, उपाध्यक्षा दीपा दाढे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे यावेळी उपस्थित होत्या. बँकेच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या ‘सुवर्ण भरारी’ स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रभू म्हणाले, ‘सहकारी बँकांची समाजाप्रति बांधिलकी आणि नात्यांचा फायदा घेत, त्यांचे सक्षमीकरण केल्यास नवीन समाजरचना निर्माण होण्यास मदत होईल. बँकांनी अधिकाधिक महिलांना उद्योग-व्यवसायासाठी पतपुरवठा करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले पाहिजे. त्याचा फायदा अर्थव्यवस्थेच्या वाढीस होईल. समाजाचा तळागाळापासून विकास करण्यासाठी सहकारी बँकांची गरज आहे.’

भाटकर म्हणाल्या, ‘सर्वसामान्य स्त्रीचा बँकेतील कामाचा सहभाग लगेच मान्य होईल अशी परिस्थिती आजही नाही. महिलांना अर्थकारण समजत नाही, असा गैरसमज भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या प्रगतीकडे पाहिला की दूर होर्इल. सदसद्विवेकबुद्धी कायम ठेवून बँकेचे कामकाज सुरू आहे.’

डॉ. पैठणकर यांनी प्रास्ताविक केले. बँकेचा आजपर्यंतचा प्रवास त्यांनी मांडला. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. आभार स्मिता देशपांडे यांनी मानले.

चांगल्या विकासदरासाठी बँकांचा ताळेबंद वाढवा -

आपल्या अर्थव्यवस्थेत बँकांना प्राथमिकता आहे. त्यामुळे देशाच्या विकासाचा दर वाढवायचा असेल तर बँकांचा ताळेबंद वाढला पाहिजे. ठेव आणि कर्जाचे व्यवहार झाले पाहिजे. बँकेतील बॅड लोनचा टक्का कमी झाला की अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळतो. मात्र बँकेच्या विश्‍वासाला तडा गेला की, ती दिवाळखोर व्हायला वेळ लागत नाही. प्रत्येक ठेवीदारांसाठी आपले पैसे सुरक्षित आहेत ही भावना खूप महत्त्वाची असते, असे डॉ. रानडे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Terror plot: गरीबनगर कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईत हल्ल्याचा कट; आयएसआय-दाऊद कनेक्शनसह नऊ आरोपी अटकेत

Vaibhav Sooryavanshi: तू किती दूध पितोस?" रवी शास्त्रींच्या प्रश्नावर Vaibhav Sooryavanshi चं उत्तर ऐकून सगळेच हसू लागले! VIDEO व्हायरल

'मी तृप्तीला दहाव्या मिनिटाला म्हणालो, चल' सिद्धार्थ जाधव रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या रिसेप्शनमधून लगेच निघून गेलेला, म्हणाला...

कोकण रेल्वेचे आस्ते कदम! तेजस एक्स्प्रेस १२ तास लेट; मांडवी, कोकणकन्याही ४ तास उशिरा, चाकरमानी हैराण

RCB vs GT Final: विराट कोहली-साई सुदर्शन भिडले, भर मैदानातच एकमेकांशी वाद घालतानाचा Video Viral

SCROLL FOR NEXT