आदित्य ठाकरे sakal
पुणे

पुणे : तळजाई टेकडी वाचविण्यासाठी आदित्य ठाकरेंना साकडे

निसर्गरम्य परिसर विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे.

सकाळ वृत्तसेवा

सहकारनगर : तळजाई टेकडीवरचा जैवविविधतेने समृद्ध असणारा निसर्गरम्य परिसर विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. तळजाई टेकटीवरील प्रस्तावित जैवविविधता वसुंधरा प्रकल्पास विरोध असल्याबाबत आणि नदी-नाले यांचा होणारा –हास थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबतचे निवेदन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना देण्यात आले.

राज्याचे पर्यावरणमंत्री म्हणून हे प्रकल्प रद्द करावेत तसेच येथील निसर्ग संवर्धणाकरिता वेगवेगळे उपक्रम राबवावेत आणि जसे मुंबईचा ऑक्सिजन म्हणजे आरे वाचविले त्याच धर्तीवर पुण्यातील ऑक्सिजन पार्क म्हणजेच तळजाई टेकटी वाचवावी अशी विनंती या निवेदनाद्वारे माय अर्थ फांउडेशन,वनराई, समग्र नदी परिवार, इन्वार्मेंट क्लब ऑफ इंडीया,सिंहगड युवा फांउडेशन,स्वराज्य यज्ञ समुह इ. पर्यावरणप्रेमी संस्थांनी आदित्य ठाकरे यांना केली आहे.तसेच

पुणे शहरातील मध्यभागातून वाहणारा मुख्य नाला आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रहाव बदलण्याचा घाट पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून घातला जात आहे. त्यामुळे भविष्यात मोठी जिवित व वित्त हाणी होऊ शकते त्यामुळे आपण याकडेदेखील लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली. तसेच पूररेषांचे नकाशे आणि नदीकाठच्या भागातील बांधकाम परवानगी याविषयावर देखील लक्ष घालण्याची विनंती या निवेदनात करण्यात आली.

सहकारनगर भागातील तळजाई टेकडीवरील सुमारे १०७ (एकशे सात एकर) जागेवर नियोजित जैवविविधता वसुंधरा प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) पुणे महापालिका प्रशासनाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर करून या प्रकल्पास १२० कोटी खर्च केला जाणार आहे. त्यामुळे येथील जागेचे कॉंक्रिटीकरण होऊन नैसर्गिक अधिवास संपुस्टात येण्याबरोबरच पुण्यातील ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळजाई टेकडीची ओळख पुसली जाण्याची भिती निर्माण होत आहे.यामुळे याला विविध पर्यावरणप्रेमी संस्थांकडून विरोध केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT