Sneha Kadam
Sneha Kadam 
पुणे

पुण्यात शिक्षकाकडून शिक्षिका पत्नीचा खून

सकाळवृत्तसेवा

हडपसर - वानवडी येथे शिक्षकाने शिक्षिका असलेल्या पत्नीवर चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली.

स्नेहा सुनील कदम (वय 35, रा. मनुचंद्र को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, आझादनगर, वानवडी) असे खून झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. या प्रकरणी सुनील दत्तात्रेय कदम (40, रा. पाथर्डी, जि. नगर, सध्या रा. लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे) याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत शिक्षिकेचे वडील बाबासाहेब केसू चव्हाण (59, रा. ससाणेनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

स्नेहा व सुनील यांचा 2000 मध्ये विवाह झाला होता. त्यांच्यात वारंवार भांडणे होत. त्यामुळे दोघेही एक वर्षापासून विभक्त राहत होते. यापूर्वी कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी सुनीलवर स्नेहाने गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर जामिनावर त्याची मुक्तता झाली होती. आठ दिवसांपासून तो पुन्हा स्नेहाला भेटण्यासाठी येत असे. काल (ता. 11) स्नेहा व मुलांना घेऊन तो फिरण्यास गेला होता. रात्री आठला त्यांना घरी सोडून तो बाहेर पडला. रात्री एकच्या सुमारास सुनील मद्यप्राशन करून पुन्हा स्नेहाच्या घरी आला. जोरजोरात दार ठोठावून त्याने दार उघडण्यासाठी आरडाओरड केली. मात्र, स्नेहा झोपी गेली असल्याने मुलाने दार उघडले. त्यानंतर सुनील याने स्वतःच्या हाताने जेवण वाढून घेतले. दरम्यान, मुलगा झोपी गेला. त्यानंतर पती-पत्नीमध्ये भांडण सुरू झाले.

या वेळी तुम्ही मद्यप्राशन करून आलात, बाहेर गाडीतच झोपा, असे स्नेहाने पतीला सांगितले. तिने पतीला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जबरदस्तीने दार ढकलून तो घरात शिरला व खिशातील चाकूने दोनवेळा स्नेहाच्या छातीत गंभीर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी स्नेहाने ओरडून मदतीसाठी याचना केली व ती खाली पडली. या वेळी पतीने वार केलेला चाकू स्वतःच्या खिशात ठेवला व किचनमधील चाकू स्नेहाच्या हातात ठेवला व तेथून पळ काढला. घाबरलेल्या मुलाने शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्नेहाला शेजाऱ्यांनी खासगी रुग्णालयात उपचारांसाठी हलविले, मात्र उपचारांपूर्वीच तिचे निधन झाले.

स्नेहा महापालिकेच्या राज्य राखीव दल येथील महापालिका शाळा क्रमांक 88 मध्ये शिक्षिका होती; तर सुनील पिंपळे सांडस येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. दोघांना मुलगा व मुलगी आहे. स्नेहाचे वडील पोलिस दलातून वरिष्ठ अधिकारी पदावरून नुकतेच निवृत्त झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT