postmen  sakal
पुणे

Pune : पोस्टमनला सापडेना नागरिकांचा पत्ता

कात्रज पोस्ट कार्यालयातील प्रकार; ग्राहकांतून नाराजी

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज - कात्रज पोस्ट कार्यालयाच्या पोस्ट कर्मचाऱ्यांना आपल्याच हद्दीतील टपाल पोहोचविण्यासाठी पत्ता सापडत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पोस्टमनलाच पत्ता सापडत नसल्याने टपाल कोणाकडून पोहोचवायचे असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. त्यामुळे कात्रज पोस्ट कार्यालयाविषयी नाराजीचा सूर उमटत आहे.

कात्रज पोस्ट कार्यालयातील पोस्टमन हे नागरिकांचे पत्ते शोधण्याची तसदी घेत नसल्याचे समोर आले आहे. पोस्टमनच्या आळशीपणामुळे येथील नागरिकांना त्यांची पत्रे तसेच पोस्टाने येणारे इतर महत्त्वाचे दस्तावेज वेळेवर मिळत नाहीत. तसेच, पाठवलेले दस्ताऐवज पत्ता सापडत नसल्याचे सांगून वापस देण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहेत.

कात्रज परिसरातील एका मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीने तिचे वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची निमंत्रण पत्रिका आपल्या सभासदांना पोस्टाद्वारे त्यांच्या पत्त्यावर पाठवली होती. त्याचे रितसर ११ रुपयांप्रमाणे जवळपास साडेतीन हजार अहवालांचे पैसेही भरले होते.

मात्र, सदरील सोसायटीकडून दिलेले पत्ते सापडत नसल्याचे कारण पुढे करत पोस्टाकडून ३० ते ३५ टक्के अहवाल परत करण्यात आले आहेत. त्यावर असणाऱ्या संपर्क क्रमांकावर संपर्क करण्याची तसदीही पोस्टमनकडून घेण्यात आली नाही.

तसेच, ते परत करताना कोणतीही रक्कम परत देण्यात आली नाही. पूर्वीप्रमाणे पोस्टाच्या सुविधांचा वापर कमी होत असताना पोस्ट खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारे सेवा मिळत असेल तर आम्ही सेवा का वापरायची असा प्रश्न यानिमीत्त नागरिक करत आहेत.

कार्यक्षम पोस्टमनची नेमणूक करावी

यापूर्वीही नागरिकांना वेळेआधीच पोस्टाच्या खिडक्या बंद करण्यात येत असल्याच्या तक्रारी केलेल्या आहेत. त्यातच वाहन परवाना, आधार कार्ड, निवडणूक कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, पारपत्र असे महत्त्वाचे दस्तावेज पोस्टाने पाठवले जातात. मात्र, कात्रज पोस्ट कार्यालयातील पोस्टमन योग्य सुविधा देत नसल्याने येथील नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे कात्रज पोस्ट कार्यालयात कार्यक्षम पोस्टमनची नेमणूक करावी, अशी स्थानिक नागरिक मागणी माधवी भोंडवे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया

सदरील प्रकरणाची तत्काळ माहिती घेऊन संबंधित दस्ताऐवज का परत येत आहेत? याची फेरतपासणी केली जाईल. तसेच, ग्राहकांकडून टाकलेले पत्ते बरोबर आहेत का? याचीही तपासणी करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल. - रविंद्र देवकर, जनसंपर्क अधिकारी, पोस्ट खाते, पुणे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT