cycle sakal
पुणे

मोहन रानडे यांच्या स्मारकासाठी पुणे ते गोवा सायकल मोहीम

गोव्याला पोर्तुगीजांच्या ताब्यातून स्वतंत्र करण्यासाठी आझाद गोमंतक दलाच्या माध्यमातून मोहन रानडे यांनी गोवामुक्तीसाठी पोर्तुगीज सरकारविरुद्ध लढा सुरू केला.

अक्षता पवार

पुणे - गोव्याला पोर्तुगीजांच्या ताब्यातून स्वतंत्र करण्यासाठी आझाद गोमंतक दलाच्या माध्यमातून मोहन रानडे यांनी गोवामुक्तीसाठी पोर्तुगीज सरकारविरुद्ध लढा सुरू केला. गोव्याला स्वतंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या मोहन रानडे यांचे स्मारक गोवा येथे व्हावे यासाठी पुणे ते गोवा सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेचे अध्यक्ष एम. डी. देशपांडे आणि विश्‍वस्त संदीप पवार यांनी दिली.

या वेळी देशपांडे म्हणाले, ‘‘रानडे यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. पुणे येथे स्थायिक होऊन रानडे यांनी या संस्थेची स्थापना केली व समाजसेवेचे कार्य सुरू ठेवले. त्यांच्या योगदानासाठी गोव्यात त्यांचे स्मारक व्हावे याकरिता संस्थेतर्फे गोवा सरकारला निवेदन देण्यात येत आहे.’’ यामध्ये गोवा विधानसभेत रानडे यांचे तैलचित्र लावणे, महिला बाल कल्याण केंद्र, चिंबलचे नूतनीकरण करणे आणि शैक्षणिक क्षेत्रातील विशेष काम करणाऱ्यास शिष्यवृत्ती देणे अशा गोष्टींची विनंती निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

या मोहिमेची सुरुवात मंगळवारी (ता. २३) कर्वेनगर येथील काकडे सिटी येथून सायंकाळी चार वाजता होणार असून, यामध्ये संस्थेचे संदीप पवार आणि पाच विद्यार्थी अशा सहा जणांचा सहभाग असेल. रानडे यांच्या स्मारकासाठी या मोहिमेंतर्गत सायकलस्वार एक लाख नागरिकांच्या सह्यांचे निवेदन घेऊन २६ नोव्हेंबरला गोव्यात पोचतील. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना २७ नोव्हेंबरला हे निवेदन देण्यात येणार आहे. मोहिमेच्या उद्‍घाटनासाठी सुमारे ५०० सायकलस्वार कर्वेनगर ते वारजे पुलापर्यंत सायकल रॅलीत भाग घेतील, असे या वेळी पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO WhatsApp Service : कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिलासा ! EPFO ची मोठी सुविधा, आता व्हॉट्सॲपवर तपासता येणार पीएफ बॅलन्स; 'या' सुविधाही मिळणार

Torrent Power Project : 'दारूच्या कारखान्याला पाठिंबा अन् टोरंटला विरोध?' महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप; रायगडमधील राजकारण तापलं

दुचाकीलाच बनवलं फिरतं पंक्चर दुकान! तरुणाचा भन्नाट जुगाड व्हायरल, पाहा VIDEO

Latest Marathi News Live Update : चाकणमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, महामार्गावर साचले पाणी

Gold Rate Today: 2 महिन्यांत सोनं 25 हजारांनी स्वस्त! दिवाळीपूर्वी भाव किती? जाणून घ्या तुमच्या शहरातील सोनं-चांदीचे ताजे दर

SCROLL FOR NEXT