Corona-Test 
पुणे

कोरोना चाचण्यांमध्ये पुणे देशात अव्वल स्थानावर

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना चाचण्यांमध्ये पुणे देशात आघाडीवर असून, चाचण्या वाढविल्यामुळे निदान होऊन रुग्णाला वेळेत उपचार मिळतात. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात समाधानकारक आहे, असे विभागीय आयुक्त सौरव राव यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येरवडा येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहामध्ये भारतीय जैन संघटना आणि पुणे महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अँटीजेन चाचणी केंद्राची राव यांनी पाहणी केली. महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक अविनाश साळवे, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, साहिल देव आदी या वेळी उपस्थित होते.

राव म्हणाले, ‘‘नैसर्गिक संकटात सामाजिक संस्थांच्या मदतीची आवश्‍यकता असते. भारतीय जैन संघटनेसारख्या अनेक सामाजिक संस्था कोरोना उपाययोजनांच्या कामात कार्यरत आहेत, ही महत्त्वपूर्ण बाब आहे. यामुळे नागरिकांची आरोग्य तपासणी गतीने होण्यास मदत झाली. कोरोनाचे वेळीच निदान झाल्याने मृत्युदर कमी करण्यास मदत झाली. कोरोनातून बऱ्या झालेल्या आणि प्लाझ्मादान पात्रतेचे निकष पूर्ण करत असलेल्या नागरिकांनी प्लाझ्मादानासाठी पुढे यावे. यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा,’’ असे आवाहन त्यांनी केले.

कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात सामाजिक संस्थांनी मदतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. कोरोना चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. निदान व उपचार वेळेत होतील, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. लवकरच पुणे शहर कोरोनामुक्त होईल. 
- मुरलीधर मोहोळ, महापौर

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT