Heavy traffic jam on Pune-Bengaluru Highway near Katraj Tunnel to Warje stretch, with vehicles stranded for over an hour due to congestion.
esakal
Katraj Tunnel to Warje Heavy traffic jam on Pune-Bengaluru Highway : दिवाळीसाठी गावी गेलेले पुणेकर आज (रविवार) परत पुण्यात येत आहेत दरम्यान, पुणे-बंगळुरू मार्गावरील कात्रज बोगदा ते थेट पुणे शहरातील वारेजभागातील उड्डाणपूलापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तब्बल दीड तासांपासून अनेक वाहनं रस्त्यावरच उभी आहेत. यामुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यात भरीस भर म्हणजे पुण्यात आज सायंकाळी पावासानेही चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे वा हतूक सुरळीत करतानाही अडथळे येत आहेत. वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांची अक्षरशा दमछाक होत आहे.
उद्या (सोमवार) पासून बहुतांश जणांचे नियिमत रूटीन सुरू होत आहे. शिवाय, अनेकांच्या दिवाळीच्या सुट्ट्या देखील संपलेल्या आहेत, याचबरोबर बहुतांश शाळा देखील उद्यापासून सुरू होणार आहेत. यामुळे दिवाळीसाठी गावी गेलेले पुणेकर कसंही करून आज रात्रपर्यंत पुण्यात पोहचत आहेत.
याशिवाय, पुणे - अहमदनगर- छत्रपती संभाजीनगर या मार्गावरही आज मोठ्याप्रमाणावर वाहन दिसून आली. या मार्गावर देखील मराठवाड्यातून येणाऱ्या वाहनांच्या अनेक ठिकाणी रांगा दिसून आल्या आहेत. मराठवाड्यातील विविध शहरांमधून मोठ्याप्रमाणात विद्यार्थी, नोकरदार हे पुण्यात वास्तव्यास आलेले आहेत. दिवाळीसाठी हे सर्वजण गावी गेले होते आता ते परतत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.