Pune Sakal
पुणे

Pune : सिंहगड घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी; प्रशासनाकडून उपाययोजनांकडे दुर्लक्ष

वाहने थांबवून ठेवल्याने पर्यटक संताप व्यक्त करताना दिसत होते.

निलेश बोरुडे

सिंहगड - रविवारच्या सुट्टीमुळे सिंहगडावर मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्याने गाडीतळ पूर्ण भरून घाट रस्तावर वाहतूक कोंडी झाली होती.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी वन समितीच्या कर्मचाऱ्यांनी घाट रस्त्यावरील कोंढणपूर फाट्याजवळ वाहने थांबवून ठेवल्याने पर्यटक संताप व्यक्त करताना दिसत होते. दर आठवड्याला ही परिस्थिती उद्भवत असताना प्रशासनाने कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत.

संततधार पाऊस सुरू असल्याने सिंहगडावरील वातावरण अत्यंत निसर्गरम्य झाले आहे. मागील एक ते दीड महिन्यापासून दर शनिवारी व रविवारी सरासरी पंधरा ते वीस हजार पर्यटक निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी व सिंहगडावरील चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येत आहेत. परिणामी दुपारी बारा वाजल्यानंतर वाहनतळ पूर्ण भरून घाट रस्त्यावर दीड ते दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत.

अनेक पर्यटक घाट रस्त्यावर वाहने उभी करुन चालत गडावर जातात, त्यामुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होतो. परिणामी वाहतूक कोंडी झाल्यानंतर दोन ते तीन तास पर्यटकांना अडकून पडावे लागते. त्यातच कोंढणपूर फाट्यापासून काही अंतर पुढे गेल्यानंतर दाट धुके असल्याने त्यामुळेही वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू असते.

वाहतूक कोंडीमध्ये दुचाकी व चारचाकी चालकांमध्ये वादावादीही होताना दिसते. संबंधित प्रशासन मात्र केवळ आला दिवस पुढे ढकलण्याच्या पलीकडे काहीही करताना दिसत नाही.

"एक ते दीड तास वाहतूक कोंडीत अडकलो होतो. पाऊस सुरू असल्याने खुप त्रास होत होता. रस्त्याच्या कडेने गाड्या लावलेल्या असल्याने थांबायलाही जागा नव्हती. गैरसोय टाळण्यासाठी काहीतरी उपाययोजना असायला हवी." मयुर पाटील, पर्यटक.

"चारचाकी वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. अनेक वाहनचालक बेशिस्तपणे मधे गाड्या घालून परिस्थिती आणखी खराब करतात. वेळेचे बंधन नसल्याने चार ते पाच तास गाड्या रस्त्यावर उभ्या करुन पर्यटक गडावर थांबतात.

त्यामुळे इतरांना त्रास सहन करावा लागतो. नियोजन व नियमावली तयार करुन काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी." सचिन सोनवणे, पर्यटक.

"वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी गडावरील गाडीतळावर व घाट रस्त्यावर कर्मचारी तैनात केलेले आहेत. वाहतूक कोंडी झाल्यानंतर कोंढणपूर फाट्याजवळ वाहने थांबवून ठेवली जातात व ज्या प्रमाणात गडावरील वाहने खाली येतील त्याप्रमाणे वर वाहने सोडली जातात.

अनेक पर्यटक घाट रस्त्यावर वाहने उभी करुन तासंतास गडावर थांबत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते." बळीराम वायकर, वनरक्षक, सिंहगड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT