Pune sakal
पुणे

Pune Traffic: पुण्यात बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई; २० हजार रुपयांचा दंड वसूल

या माध्यमांतून एकूण २७ रिक्षा चालकांवर कारवाई करत २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pune Traffic - कात्रज चौकात व परिसरातील बेशिस्त व वाहतूक नियम न पाळणाऱ्या आणि वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या अवैध रिक्षा चालकांवर भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली.

कात्रज चौक परिसरात वाहतूक विभागाच्या वतीने नो-पार्किंग नो-हॉल्टिंग करण्यात आले आहे. या चौकात अनेक रिक्षा चालक खाजगी पार्किंग असल्यासारखे गाड्या लावत असतात. संबधित रिक्षाचालकांना सूचना देऊनही फरक पडत नसल्याने एमव्ही अॅक्टअंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

या माध्यमांतून एकूण २७ रिक्षा चालकांवर कारवाई करत २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कात्रज चौकात वाहतुकीची मोठी वर्दळ असते.

वारंवार सूचना देऊनही रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा कमी होत नव्हता. त्यामुळे वाहतूकीला अडथळा होत असल्याचे लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली. यापुढे कारवाई सुरू राहणार असल्याचे यावेळी कणसे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

SCROLL FOR NEXT