पोलिसांची कारवाई sakal
पुणे

Pune : बारामतीत दोन दिवसात 90 वाहनांवर पोलिसांची कारवाई

रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनावर वाहतूक अधिनियम कलम 122, 117 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली असून भा.दं.वि. कलम 283 प्रमाणे चार खटलेही दाखल करण्यात आलेले आहेत.

मिलिंद संगई, बारामती.

Pune - बारामती - शहरातील विविध रस्त्यांवर होणा-या अस्ताव्यस्त पार्किंगच्या विरोधात शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून शुक्रवारपासून (ता. 2) कडक कारवाईस प्रारंभ झाला आहे.

शुक्रवारी (ता. 2) पहिल्याच दिवशी रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेल्या 40 वाहनांवर तर शनिवारी (ता. 3) 40 अशा प्रकारे दोन दिवसात तब्बल 90 वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक पोलिस निरिक्षक बिराप्पा लातूर यांच्या नेतृत्वाखाली बारामतीत फिरुन कारवाई केली.

अनेक ठिकाणी पार्किंगला बंदी असतानाही चार चाकी वाहने लावणा-या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या शिवाय विविध चौकामध्ये कार्यरत वाहतूक पोलिसांना अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनीही कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे या मोहिमेचे समन्वयन करीत आहेत.

रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनावर वाहतूक अधिनियम कलम 122, 117 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली असून भा.दं.वि. कलम 283 प्रमाणे चार खटलेही दाखल करण्यात आलेले आहेत.

दरम्यान सर्वच वाहनचालकांनी वाहतूकीला अडथळा होईल किंवा नो पार्किंग क्षेत्रात वाहने पार्क केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. जेथे पार्किंगची सुविधा आहे अशाच ठिकाणी वाहने लावण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT