Pune-Traffic 
पुणे

पुणेकरांनो, न्यू इयर सेलिब्रेशनसाठी बाहेर पडताय? वाहतुकीतील बदल जाणून घ्या!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नववर्षाच्या स्वागतानिमित्त मंगळवारी (ता.31) रात्री शहरातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यादृष्टीने शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. कॅम्प आणि फरासखाना वाहतूक विभागातील वाहतुकीमध्ये बदल असणार आहे.

याबरोबरच मंगळवारी (ता.31) सायंकाळी सहा वाजल्यापासून ते बुधवारी (ता.1) पहाटे गर्दी संपेपर्यंत शहरातील सर्व सिग्नल सुरु राहणार आहेत. त्यादृष्टीने वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. 

सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील नागरीक मोठ्या संख्येने रस्त्यावर गर्दी करणार आहे. नागरीकांना नववर्षाचा आनंद घेता यावा, कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये, यादृष्टीने वाहतूक शाखेकडून वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु यांनी दिली आहे. शहरातील कॅम्प व फरासखाना भागातील रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये बदल केला आहे. 

नववर्षानिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे शिवाजी रस्त्यावर चारचाकी वाहने आणि सर्व प्रकारच्या बसला बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंदी असणार आहे. त्यानुसार वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. 

शिवाजी रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बुधवारी बदल :

- स.गो.बर्वे चौकातुन स्वारगेटकडे जाण्यासाठी स.गो.बर्वे चौक ते स्वारगेट या मार्गावरील वाहतूक स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रोड मार्गे खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रोडने इच्छित स्थळी जातील. 

- स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनाकडे जाण्यासाठी स. गो. बर्वे चौक ते मनपा या मार्गावरील वाहतूक स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रोड मार्गे झाशीची राणी चौक येथून डावीकडे वळून मनपाकडे जातील. 

कॅम्प परिसरातील वाहतुकीमध्ये बदल :

- वाय जंक्‍शनवरुन एम.जी. रोडकडे येणारी वाहतूक 15 ऑगस्ट चौक येथे बंद करुन वाहतूक कुरेशी मशीद व सुजाता मस्तानी चौकातुन पुढे जाईल. 
- ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार आहे.  

- व्होल्गा चौकाकडून महम्मद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून संबंधीत वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकातुन पुढे जाईल. 
- इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून संबंधित वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलिस ठाणे चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
- सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करुन ती ताबूत स्ट्रीट मार्गे पुढे सोडण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammed Shams Aalam : भारतीय पॅरा-जलतरणपटूवर लैंगिक छळाचा आरोप; जपानमधून भारतात पाठवले, आजीवन बंदीची शक्यता

Pune News: पुण्यात हवाई पर्यटनाला नवी झेप! हडपसरचे २५० एकरांचे ग्लायडिंग सेंटर बदलणार; हेलिपोर्ट, हवाई साहसी खेळ अन् एव्हिएशन गॅलरी साकारणार

Latest Marathi News Live Update : कर्नाटकचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांशी चर्चेसाठी नवी दिल्लीला जाणार

IND vs NZ 1st T20I : वैभव सूर्यवंशी OUT, Kuldeep Yadav ला पण स्थान नाही; दिग्गजाने जाहीर केली भारताची Playing XI

Satej Patil Strategy Gokul Chairman : गोकुळ अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील चुयेकरांसाठी पुन्हा संघर्ष?, कोरमअभावी सभा तहकूब होण्याची शक्यता; सतेज पाटील फोडाफोडीची चाल खेळणार का?

SCROLL FOR NEXT