Tukaidarshan Chowk Road Sakal
पुणे

डोके फुटो, हातपाय मोडो, जीव जावो, सारं कसं ओक्के

डोके फुटो, हातपाय मोडो, जीव जावो, आम्हाला काय त्याचे... पालखी मार्ग काय, पावसाच्या पाण्याने भरलेले खड्डे काय, चिखल काय, सारं कसं एकदम ओक्के...

अशोक बालगुडे

डोके फुटो, हातपाय मोडो, जीव जावो, आम्हाला काय त्याचे... पालखी मार्ग काय, पावसाच्या पाण्याने भरलेले खड्डे काय, चिखल काय, सारं कसं एकदम ओक्के...

उंड्री - डोके फुटो, हातपाय मोडो, जीव जावो, आम्हाला काय त्याचे... पालखी मार्ग काय, पावसाच्या पाण्याने भरलेले खड्डे काय, चिखल काय, सारं कसं एकदम ओक्के... होय... कामाचे श्रेय कोणीपण घ्या फक्त तरी खड्डे बुजवा, अशी आर्जवी मागणी पालखी मार्गावर वाहन चालविणाऱ्यांकडून केली जात आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी या मार्गावरून जाणार म्हणून साईडपट्ट्यांचे डांबरीकरण केले, ते १५ दिवसांत वाहून गेले. त्यामुळे दुचाकीचालकांना रस्त्यावरून खाली येता येत नाही आणि खाली आले, तर पुन्हा रस्त्यावर जाता येत नाही, अशी भयावह अवस्था आहे. पावसामुळे निसरडा रस्ता झाल्याने दुचाकी आणि पादचाऱ्यांना घसरून अपघात होत आहेत. भेकराईनगर, पॉवर हाऊस, फुरसुंगी उड्डाण पुल, मंतरवाडी चौक, उरुळी देवाची फाटा, वडकी गाव, फाटा, दिवेघाट दरम्यान डोळ्यासमोर मृत्यूच दिसत असल्याची तक्रार वाहनचालकांनी केली. भेकराईनगर चौकात भले मोठे खड्डे पडले आहेत. वाहनांना खड्ड्यात अपघात होऊ नये म्हणून तेथे दगड व प्लॅस्टिकचा रबरी फुगा सजग नागरिकांनी लावला आहे. वाहनचालकांनी वाहने चालविताना काळजी घ्यावी, असा सबुरीचा सल्ला सूज्ञ नागरिकांनी दिला आहे.

प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पालखी मार्ग रखडला असल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिक दररोज मरणयातना भोगत आहेत. पालखी मार्गाच्या कामात अडथळे आणणाऱ्याला फटका बसल्यानंतर त्याचे महत्त्व कळेल. एखादा खड्डा बुजवायचा आणि लगेच पाच-पन्नास फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करायची लागन अलीकडे बहुतेकांना झाली आहे.

- मयूर शिंदे, पॉवर हाऊस

सासवड मार्गाचे नामकरण पालखी मार्ग केले, रस्त्याचे हस्तांतरण राष्ट्रीय महामार्गाकडे झाले, मात्र रस्त्याच्या कामाला मुहूर्त काही मिळत नाही. चाकरमानी आणि मुले शाळेतून घरी येईपर्यंत जीव टांगणीला लागलेला असतो. आणखी किती जीव गेल्यानंतर या रस्त्याचे काम होईल.

- राजाभाऊ होले, तुकाईदर्शन

रस्ता कमी खड्डे जास्त, अरुंद रस्ता, त्यात प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई, त्यामुळे अपघाताचा नेम नाही. मागिल दहा-पंधरा वर्षांपासून पालखी मार्गाचे रुंदीकरणाच चऱ्हाट सुरू आहे. अधिकारी आणि नेत्यांच्या महागड्या गाड्यात खड्डे जाणवत नाहीत आणि बंद काचांमुळे दिसत नाही, त्यांच्यासाठी पोलीस लगेच रस्ता मोकळा करून देतात. मात्र, सामान्यांच्या बाबतीत तसे होत नाही, हेच मोठे दुर्दैव आहे.

- शादाब मुलाणी, संतप्त युवक

रस्त्याच्या कामाचे श्रेय कोणीही घ्या, रस्ता रुंदीकरण नाही तर किमान खड्डे तरी बुजवा. एरवी छोटेशे काम केले, तर लगेच नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे काम झाल्याचे पाच-पन्नास फोटो सोशल मीडियावर टाकून झळकतात. जनतेने भरलेल्या कररूपी पैशातून ही कामे होतात, याचे किमान भान राखायला पाहिजे.

- विनोद सातव, तुकाईदर्शन

दिवेघाट ते तुकाईदर्शन दरम्यान १३.२५० किमी रस्ता असून, वनविभागाची परवानगी मिळाल्यानंतर टेंडर प्रोसेस सुरू होईल, त्यानंतर रस्त्याचे काम सुरू होईल. शेजारच्या कामावरील ठेकेदाराकडून तुर्तास दुरुस्तीचे काम करून घेतली जात आहेत.

- अनिल गोरड, राष्ट्रीय महामार्ग विभाग

राष्ट्रीय महामार्गकडून महापालिकेकडे हस्तांतरित केला नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम करता येत नाही. या रस्त्यासाठी बजेट टाकता येत नाही, अशी द्विधा अवस्था झाली आहे.

- अमित शेटे, शाखा अभियंता, पथविभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT