पुणे

पुणे विद्यापीठाचा ‘मास कम्युनिकेशन' विभाग देशामध्ये चौथा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावत्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागाला देशात चौथ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त झाले आहे. ‘इंडिया टुडे’ या मासिकाने देशातील शैक्षणिक संस्थांचे सर्वेक्षण केले. त्यात ‘मास कम्युनिकेशन कॉलेज’च्या गटात विभागाने हे स्थान पटकाविले आहे.

‘इंडिया टुडे’ मासिकातर्फे दरवर्षी देशातील प्रत्येक शाखेमधील शिक्षणसंस्थांचे सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार विद्यापीठाचा हा विभाग २०१९ तसेच २०२० या दोन्ही वर्षांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी विभागाने ‘एमएस टीम प्रणाली’ आत्मसात केली. त्याद्वारे अध्यापन, प्रात्यक्षिक परीक्षा, मूल्यांकन, प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे नव्याने उभारली. ‘विद्यार्थी शिक्षण’ केंद्रस्थानी ठेवून कशा प्रकारे परीक्षा घेण्यात आल्या, यावरही या मासिकात प्रकाश टाकला आहे. विद्यार्थ्यांना या नव्या शिक्षण पद्धतीने शिकताना काय अनुभव आले हे देखील या सर्वेक्षणा दरम्यान जाणून घेतले आहे.

''विभागाला विशेष बनविण्यासाठी शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. कोरोनाच्या काळातही विभागाला चौथ्या क्रमांकाचे स्थान टिकवून ठेवण्यात यश आले आहे.''

- डॉ. माधवी रेड्डी, विभाग प्रमुख, माध्यम व संज्ञापन अभ्यास विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Parab: मृत्यूनंतर खरंच बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले? अनिल परबांनी फोटो दाखवत कदमांची बुद्धी काढली

न्यायाचा बाजार! जामिनासाठी लाच अन् जप्त ड्रग्जची तस्करी; सातारा, पालघरचे न्यायाधीश बडतर्फ, एकजण कार्डेलियावर नशेत सापडलेला

IND vs AUS: रिषभ पंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतासाठी खेळणार नाही? मोठं कारण आलं समोर

Palghar News: आरक्षणावरून एल्गार! धनगर, बंजारांच्या मागणीविरोधात आदिवासींचा मोर्चा

Latest Marathi News Live Update : आज देशभरातील तरुणांसाठी दोन प्रमुख शिक्षण आणि कौशल्य विकास प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत : पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT