Pune University give opportunity practiced MCQ five times before final Year Exam 
पुणे

विद्यार्थ्यांनो, आता पाच वेळा करता येणार एमसीक्यूचा सराव!

ब्रिजमोहन पाटील

पुणे : अंतिम वर्षाची परीक्षा देण्यापूर्वी विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्नांचा (मल्टिपल चॉइस क्वेश्चन-एमसीक्यू) सराव करण्यासाठी पाच वेळा संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. 

पुणे विद्यापीठातर्फे पदवी आणि पदव्युत्तर पदवीची अंतिम वर्षाचे परीक्षा 12 ऑक्टोबर पासून ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून घेतली जाणार आहे. ही परीक्षा ऐन वेळी एमसीक्यू पद्धतीने घेतली जाणार असल्याने विद्यार्थ्यांचा त्यास विरोध होता. मात्र, विद्यापीठ आपल्या निर्णयावर ठाम असल्याने विद्यार्थ्यांनी या नवीन पद्धतीच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी प्रश्नसंच दिला अशी मागणी केली होती. विद्यापीठाने ही मागणी देखील अमान्य करत परीक्षेच्या पूर्वी नमुना प्रश्नसंच याद्वारे सराव परीक्षा घेतली जाईल असे स्पष्ट केले होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यापीठाने १२ ऑक्टोबरपासूनचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यापूर्वी ८ ऑक्टोबर ते ११ऑक्टोबर या कालावधीत सकाळी दहा ते सायंकाळी सहा या दरम्यान सराव परीक्षेसाठी वेळ उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यास किमान पाच वेळा एमसीक्यू प्रश्न सोडविण्याचा सराव करता येईल. विद्यार्थ्यांना प्रश्नांचे आकलन होण्यासाठी  ६० प्रश्नांची  व  ५० गुणांची  एका तासाची सराव चाचणी घेतली जाणार आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. 

या चाचणी देण्यासाठी संगणकीय प्रणालीत प्रवेश मिळवण्यासाठी https://sppu.wheebox.com/LOGIN-2/sppu.jsp या युआरएल चा वापर करावा. विषयनिहाय प्रश्नसंच स्वतंत्रपणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. या संदर्भातील सर्व माहिती स्टुडन्ट प्रोफाइलवर उपलब्ध करून दिली आहे, असेही काकडे यांनी स्पष्ट केले आहे. 

बार, हॉटेलचालकांनो, आता नियम मोडू नका नाहीतर... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO News: नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी EPFO चा महत्त्वपूर्ण निर्णय; कुटुंबियांनाही फायदा होणार, नवीन नियम काय?

PM Modi: ओमानमध्ये मोदींचं स्वागत बघून मुस्लिम जग हादरलं! पाकिस्तानी एक्सपर्टचा संताप, ''भारताकडे एवढं लक्ष...''

Mumbai News: मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास होणार, ५१ टक्के भाडेकरूंची संमती पुरेशी; उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

Kolhapur Election : वीस प्रभागांतून तब्बल ३२९ इच्छुक; काँग्रेससमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान

Viral Video : 'हा' व्हिडिओ पाहून चीड येईल! भररस्त्यात जावयाचे सासूसमोर लोटांगण, तरीही पत्नी मिळालीच नाही, नेमका काय प्रकार?

SCROLL FOR NEXT