Convocation 
पुणे

पदवी प्रमाणपत्रासाठी पुणे विद्यापीठानं मुदत वाढवली; पाहा नवीन तारीख

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल उशिरा लावल्याने अद्याप अनेक विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची अडचणी येत असल्याने 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुणे विद्यापीठाचा 118वा पदवी प्रदान समारंभ मार्च-एप्रिल 2021मध्ये होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी विद्यापीठाने पदवी व पदविका प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. अर्ज भरण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत होती. तर विलंब शुल्कासह 15 जानेवारी 2021पर्यंत मुदत होती.

विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन निकाल जाहीर केले आहेत, परंतु मूळ गुणपत्रिका महाविद्यालयातून उपलब्ध होते. पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन गुणपत्रिका ग्राह्य धरली जाणार नाही, त्यासाठी गुणपत्रिकेची हार्डकॉपी स्कॅन करून अपलोड करणे आवश्‍यक आहे. विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे, मात्र अद्याप अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयांकडून गुणपत्रिका मिळालेली नसल्याने अर्ज भरता आलेला नाही.

ही मुदत संपण्यासाठी तीन दिवसांचाच कालावधी शिल्ल्क राहिल्याने परीक्षा विभागाने आता नोंदणीसाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत वाढवली आहे. तर विलंब शुल्क भरून नोंदणीसाठी 31 जानेवारीची मुदत आहे. दरम्यान, अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी युवक क्रांती दलाचे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे यांनी केली होती. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी convocation.unipune.ac.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT