Pune-University 
पुणे

परीक्षा फी अन् बॅकलाॅगचं काय होणार? विद्यार्थी गोंधळले!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्कही भरले आहे, त्यांना ते शुल्क परत मिळणार का?, तसेच ज्यांचे विषय बॅकलाॅग आहेत, त्यांच्या परीक्षा होणार का? याबाबत विद्यापीठाने खुलासा करून गोंधळ दूर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 

राज्य सरकारने विद्यापीठाच्या परीक्षा कशा घ्यायच्या याचे नियोजन गुरुवारी (ता.८) जाहीर केले आहे. यामध्ये शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या अंतिम सेमिस्टरची परीक्षा घेतली जाणार आहे. तर प्रथम, द्वितीय आणि तिसऱ्या वर्षाच्या पहिल्या सत्राच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही, असे म्हटले आहे.  

पुणे विद्यापीठाने मार्च महिन्यात पदवीच्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू केल्या होत्या. प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाचे काही पेपर झालेले आहेत. आता पुढील परीक्षा रद्द झाल्याने विद्यापीठाने परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे. हे शुल्क पुढच्या वर्षीच्या परीक्षा शुल्कात जमा करू नये, अशी मागणी फर्ग्युसन महाविद्यालयाची विद्यार्थीनी शर्मिला येवले हिने केली आहे. 
पुणे विद्यापीठात दरवर्षी हजारो विद्यार्थी बॅकलाॅगची परीक्षा देतात.

सरकारने प्रथम, द्वितीय वर्षाची परीक्षा रद्द केली आहे, पण ज्यांचे विषय बॅकलाॅग आहेत, त्यांचे काय होणार याबाबत भूमिका स्पष्ट झालेली नाही. तसेच परीक्षा शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा परतावा करावा, अशी मागणी स्टुडंट हेल्पींग हँडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी केली आहे.

शेवटच्या वर्षातील, शेवटच्या सत्राची परीक्षा होणार आहे, पण विद्यार्थ्यांना एटीकेटी असेल, तर त्यांची परीक्षासुद्धा जुलैमध्ये होणार का? जर होणार नसेल, तर त्यांचे वर्ष वाया जाईल, त्या विद्यार्थ्यांना दुसरीकडे प्रवेश घेता येणार नाही. याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी युक्रांदचे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे यांनी केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Expressway : मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात; महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटण्यास आणखी तीन महिने प्रतीक्षा

Pune Wildlife News : शिरूर तालुक्यात बिबट्याचे तीन बछडे आढळल्याने उडाली खळबळ; शेतकरी, ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण

Pune-Mumbai Traffic Jam : ‘एसटी’ला पंधरा लाखांचा फटका, द्रुतगती मार्गावरील कोंडीचा परिणाम; गुरुवारी ६६ शिवनेरी बस रद्द

Latest Marathi News Live Update : विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संभाजी भगत यांची निवड

Mumbai-Pune Expressway Traffic jam : द्रुतगतीवरील कोंडी धोक्याची घंटा, महामार्गावर आपत्ती व्यवस्थापनाची कसोटी; यंत्रणांतील मर्यादा उघड

SCROLL FOR NEXT