UPSC
UPSC Sakal
पुणे

Upsc Time Table : युपीएससीकडून २०२४ मध्ये २४ परीक्षा; संभाव्य वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - उमेदवारांना पुढील वर्षातील परीक्षेचे नियोजन करता यावे म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) वतीने दरवर्षी संभाव्य वेळापत्रक घोषित करण्यात येते.

यंदा युपीएससीने पुढील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये होणाऱ्या विविध २४ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बहुतांश विद्यार्थ्यांची पसंती असलेल्या नागरी सेवा पूर्व परीक्षा २६ मे २०२४ रोजी नियोजित आहे. तर मुख्य परीक्षा सप्टेंबर २०२४ महिन्यात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे आता तयारीसाठी वर्षाचा कालावधी आहे.

आयोगाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकामध्ये परीक्षेच्या तारखांसह जाहिरात कधी निघणार, अर्ज करण्याची अंतिम मुदत ही माहिती दिली आहे. नागरी सेवा परीक्षेसह वन सेवा, अभियांत्रिकी सेवा, एनडीए, वैद्यकीय सेवा, सीडीएस, जिओ सायन्टिस्ट, सीआयएसफ आदी परीक्षांचा समावेश आहे.

परीक्षांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी हे वेळापत्रक युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. दरम्यान, परिस्थितीनुसार परीक्षेचा तारखा, अधिसुचना किंवा परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम मुदतीच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या परीक्षांचे २०२४ मधील वेळापत्रक

  • अभियांत्रिकी सेवा (पूर्व) परीक्षा - १८ फेब्रुवारी (रविवार)

  • सीडीएस परीक्षा (१) - २१ एप्रिल (रविवार)

  • नागरी सेवा (पूर्व) परीक्षा - २६ मे (रविवार)

  • भारतीय वन सेवा (पूर्व) - २६ मे (रविवार)

  • संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा - १४ जुलै (रविवार)

  • केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (ACS) परीक्षा - ४ ऑगस्ट (रविवार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापूर-पेणमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पश्चिम बंगालमध्येही आंदोलन

"मी हत्या केलीच नाही," हत्येचे 8 गुन्हे असलेल्या महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT