pune sakal
पुणे

Pune news : मोरेवस्तीवरील इंगवलेंनी फुलविली टेरेसवर भाजीपाला-फुलेझाडी

नोकरी-व्यवसायानिमित्त शहरवासिय झाल्यानंतर शेतीपासून काहीसे आपण दूर आलो

अशोक बालगुडे

उंड्री : नोकरी-व्यवसायानिमित्त शहरवासिय झाल्यानंतर शेतीपासून काहीसे आपण दूर आलो आहे. मात्र, तरीसुद्धा भाजीपाला, फुलझाडांवरचे प्रेम काही कमी झाले नाही. स्वतः पिकविलेला भाजीपाला आणि फुलझाडे काही औरच आनंद देतात. भरपूर शेती नसली तरी फ्लॅटमधील गॅलरी किंवा टेरेसवर फुलझाडीबरोबर शेतमाल पिकविण्याची शक्कल महिलांनी लढविली आहे. त्यातीलच मोरेवस्ती (ता. हवेली, जि. पुणे) येथील शालन इंगवले यांनी घराच्या छतावर दररोजच्या वापरासाठीची ताजा भाजीपाला आणि देवपुजेसाठी फुलझाडे लावली आहेत.

इंगवले म्हणतात वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, शेवंती, गोकर्णी, गवती चहा, गुलाबांची लागवड केली आहे. दररोज ताजा भाजीपाला मिळतो, देवपुजेला फुलेही मिळतात. एवढेच नव्हे, तर छान भाजीपाला आणि फुलझाडांना पाणी देत देखभाल करताना व्यायाम होतो, वेळही छान जातो, त्यांना काय हवं काय नको हेही पाहता येतो.

हवामानानुसार पाणी कमीजास्त द्यावे, माती बदलते, शेणखतचा वापर करून छान शेती फुलताना पाहयला मिळत आहे. ऐनवेळी घरी कोणी आले, तर पोहे करण्यासाठी पटकन टेरेसवरून जाऊन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणता येते. कृत्रिम स्प्रे मारण्यापेक्षा फुलांचा सुगंध परिसरात पसरतो, त्यामुळे वातावरण आनंददायी होते, ये-जा करणारेही फुलझाडांविषयी विचारपूस करतात तेव्हा मनोमन समाधान वाटते. कोरोना महामारीमध्ये प्रत्येकाने ऑक्सिजनचे महत्त्व जाणले आहे.

त्यामुळे स्वच्छ आणि शुद्ध ऑक्सिजनसाठी प्रत्येकाने गॅलरी, टेरेसवर छोटीशी बाग फुलवायला हवी. टेरेस गार्डनमुळे टेरेसही स्वच्छ राहते, शुद्ध हवा मिळते. स्वतःची शेती फुलताना पाहून मनोमन समाधान मिळत आहे. प्रत्येकाने टेरेस, बाल्कनी, पार्किंगच्या छोट्याशा जागेत बाग फुलवून कचरा जिरविण्याची नवी संकल्पना अवलंबिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident in Kolhapur : कोल्हापुरात भीषण अपघात भरबाजारात घुसले वडाप, एका महिलेचा मृत्यू, दोन महिला गंभीर

Abhishek Sharma New Car : अभिषेक शर्माने घेतली नवी 'Ferrari Purosangue', किंमत अन् फिचर्स ऐकून डोळे पांढरे होतील...

Latest Marathi News Live Update : ATSच्या कारवाईत अटक झालेल्या तोसिफ शेखला मालेगाव न्यायालयात करण्यात आले हजर

US Visa Policy: गोंधळ ओसरला, मात्र धाकधूक कायम! अमेरिकेच्या ‘एच-वन-बी व्हिसा’बाबत आयटीयन्सची परिस्थिती

IND vs WI 2nd Test Live: शुभमन गिलने MS Dhoni ची परंपरा राखली... विजयाची ट्रॉफी बघा कोणाच्या हाती सोपवली; Video Viral

SCROLL FOR NEXT