crime Two bodies in one place Murder suicide case sakal
पुणे

पुणे : मुलीसोबतचे मैत्रीसंबंध तोडण्यास सांगत तरुणाचा खून

वारजे माळवाडी पोलिसांकडून चार जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नातेवाईक मुलीसमवेतचे मैत्रीसंबंध तोडून टाकण्यास सांगून टोळक्‍याने तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हि घटना शिवणे परिसरात घडली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी एका महिलेसह चौघांना अटक केली.

प्रद्युन्य प्रकाश कांबळे (वय 22, रा. रामोशीवाडी, सेनापती बापट रस्ता) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अजय विजय पायगुडे (वय 19 ), विजय किसन पायगुडे (वय 50, तिघेसी रा. साईश्रद्धा रेसीडन्सी, दांगट पाटीलनगर, शिवणे), सागर गोविंद राठोड (वय 21, रा. लक्ष्मीनगर, डहाणूकर कॉलनी, कोथरूड) यांच्यासह एका महिलेस अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाच्या आत्याचा मुलगा प्रद्युम्न कांबळे याचे पायगुडे यांच्या नात्यातील एका मुलीशी मैत्री होती.

संबंधित मुलीसमवेतची मैत्री तोडून टाकण्यासाठी पायगुडे कांबळेवर दबाब टाकत होते. मुलीला त्रास देऊ नको, असे आरोपींनी कांबळे यास वारंवार सांगितले होते. दरम्यान, कांबळे हा दोन दिवसांपुर्वी शिवणे परिसरात गेला होता. त्यावेळी आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. सिमेंटचा गट्टू तसेच लोखंडी सळईने त्यास बेदम मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये जबर जखमी झाल्याने कांबळे यास उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यु झाला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक आर. एन. पार्वे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : घाटकोपर दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू, अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली

Satara Road Condition: खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला, मुसळधार पावसाने रस्त्यांची अवस्था बिकट; सणासुदीपूर्वी डागडुजीचे प्रयत्न

Malkapur News: आई गेली... बाबा दुरावला; कोण आधार चिमुरड्यांचा? रात्रीत हरपले आई-वडिलांचे छत्र; चौथी, दुसरीतील भावंडांसमोर भवितव्‍याचा प्रश्‍न

Deep Amavasya 2026: दीप अमावस्येला कणकेचा दिवा दक्षिण दिशेलाच का ठेवतात? जाणून घ्या या परंपरेमागचं कारण आणि महत्त्व

संसदेत चेंबरमध्ये का बसतात? सभागृहात का गेले नाहीत? अमित शहांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT