गळती निवारण्याकडे पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष sakal
पुणे

मुंढवा : गळती निवारण्याकडे पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

गेल्या तीन दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंढवा : उपनगरात एकीकडे पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असते, तर दुसरीकडे मुंढवा येथील कामगार मैदानात गळतीद्वारे गेल्या तीन दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. येथील गळती निवारण करण्याकडे पाणी पुरवठा विभागाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. परिणामी केशवनगरमध्ये नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. येथे लवकर दुरूस्ती करावी अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे.

कामगार मैदानतील जलवाहिनीला गळती लागून तिन दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाहत असून, ते पाणी संपुर्ण रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे दुचाकी वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. दुचाकी घसरून अपघातास तोंड द्यावे लागत आहे. मोठा अपघात होण्याआधी पाणीपुरवठा विभागाने दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.

मुंढवा-केशवनगर परिसरातही काही ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागून दररोज पाणी वाया जात आहे. पण गळती निवारण करण्याकडे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. पण त्याचा फटका थेट नागरिकांना बसत आहे. याकडे पाणी पुरवठा विभागासह पालिकेने दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.

याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता इंद्रजीत देशमुख म्हणाले, मी लगेचच दुरूस्ती करून घेतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Record : ख्रिस गेलचा १७५ धावांचा विक्रम उद्ध्वस्त, Lhuan-Dre Pretorius ने रचला इतिहास; २८चेंडूंत १३८ धावा

बालीत सुट्टी एन्जॉय करणं पडलं महागात! नुसरत भरुचा हिचा भीषण अपघात, ऑक्सिजन सपोर्टवर मुंबईत आणलं, Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Ratnagiri News : देवरूखच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस मोबाईल मेडिकल युनिट बंद; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Weather: ऑक्टोबर हीट'चा मुंबईला चटका, तापमानाचा पारा चाळिशीजवळ; पाहा IMDचा अंदाज

SCROLL FOR NEXT