पाणी  sakal
पुणे

पुण्याची पाणी कपात रद्द; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची घोषणा

३४ गावांचा समावेश व लोकसंख्या वाढत असल्याने पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कुठलिही कपात केली जाणार नाही.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : पाटबंधारे विभागाने पोलिस बंदोबस्तात पाणी कपात करण्याचा निर्णय घेतल्याने यावरून आज राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना यामध्ये हस्तक्षेप करून ‘‘पुणेकरांच्या पाण्यात कुठलिही कपात होणार नाही. गावांच्या समावेशामुळे पाण्याची गरज वाढली असून पुणेकरांना अधिकचे पाणी कसे उपलब्ध होईल, यासाठी आमचे प्रयत्न आहेत.’’ असे स्पष्ट करत दिलासा दिले. मात्र, याचवेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ११ वेळा पाणी कपातीची पत्र पाठविण्यात आली व धरणावरील पंप बंद केले होते याची आठवण भाजपला पाटील यांनी करून दिली.

पुणे महापालिकेला भामा आसखेड धरणातून रोज सुमारे १६० एमएलडी पाणी मिळत असल्याने एवढेच पाणी खडकवासला धरणातून कमी केले जाणार आहे. त्यासाठी ३ डिसेंबर पासून पोलिस बंदोबस्तात पाणी कपात केली जाईल, असे पत्र पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाठविल्याने गेल्या दोन दिवसांपासून यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यावर आज (ता. ४) जयंत पाटील यांनी सिंचन भवन येथे पत्रकार परिषद घेतील. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पाटील यांची भेट घेऊन पाणी कपात करू नये अशी मागणी केली.

जयंत पाटील म्हणाले, ‘‘पुण्याला प्रति माणसी १५० लिटर याप्रमाणे पाणी दिले जात आहे. २०३१ची ७६ लाख लोकसंख्या गृहीत धरून, सध्या १४ टीएमसी पाणी कोटा मंजुर केला आहे. पण सध्या यापेक्षा जास्त पाणी पुरवठा केला जात आहे. ३४ गावांचा समावेश व लोकसंख्या वाढत असल्याने पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कुठलिही कपात केली जाणार नाही. पाणी कपात करण्याचा जलसंपदा विभागाचा कोणताही प्रस्ताव नाही, निर्णय झालेला नाही. उलट शहराठी जास्त पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष वाढतच जाणार असल्याने शेती, उद्योगांनाही पाणी द्यावे लागणार आहे. थोडा जरी पाऊस कमी झाला की गंभीर स्थिती निर्माण होते. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याची गरज आहे.’’ असे पाटील यांनी सांगितले.

...हे श्रेय भाजपलाच

देवेंद्र फडणवीस यांनी पाणी कपात करणाऱ्यांना पुणेकर पाणी पाजतील असे वक्तव्य केले, पण मला याचे आश्‍चर्य वाटत आहे. त्यांच्या काळात ११ पत्र महापालिकेला देण्यात आली, एवढ्यावरच न थांबता महिनाभर पंप बंद करून पाणी कपात केली होती. महापालिका भाजपच्या ताब्यात गेल्यापासून पुणेकरांना पाण्याची चिंता वाटते याचे श्रेय मी भाजपलाच देतो, असा टोला पाटील यांनी मारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT