weekend lockdown 
पुणे

पुण्यात वीकेंड लॉकडाउन रद्द; आयुक्तांनी काढले नवे आदेश

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाबाधितांची संख्या घटू लागल्याने महापालिकेने टप्प्याटप्प्याने अनलॉकच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. शनिवारपासून आता आठवड्याच्या सातही दिवस अत्यावश्‍यक आणि जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांसह काही ठराविक दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेस सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारी असलेले वीकेंड लॉकडाउन रद्द करण्यात आला आहे.

राज्यातील लॉकडाउन आणखी १५ दिवसांपर्यंत वाढविण्याचा शक्यता आहे. त्याबाबतची नियमावली एक जून रोजी राज्य सरकारकडून जाहीर केले जाणार आहे. हे करताना ज्या जिल्ह्यांमध्ये करोनाचा पॉझिटिव्हीटी रेट हा कमी आहे. त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंधामध्ये सवलत देण्याचा अधिकार महापालिका आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी शुक्रवारी याबाबतचे आदेश काढले. व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी मिळणार का हे राज्य सरकारकडून नियमावली जाहीर झाल्यानंतर समोर येणार आहे.

आठवडाभर काय राहणार सुरु?

(वेळी सकाळी ७ ते ११)

- किराणा, भाजीपाला, फळ विक्री दुकाने, डेअरी, मिठाई, चिकन, मटन, अंडी, मासे विक्री आणि सर्व प्रकाराची खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने

- कृषी संबधित बी, बियाणे, खते, उपकरणे, त्यांच्याशी निगडीत देखभाल दुरुस्ती सेवा ही दुकाने

- पाळीव प्राणी खाद्यांची दुकाने

- पावसाळा हंगामाकरिता नागरिक अथवा संस्थांसाठी साहित्याची निर्मिती करणारी दुकाने

- चष्म्याची दुकाने

राज्यातला लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढणार

राज्यात लॉकडाऊनमध्ये 15 दिवसांनी वाढ करण्यात येणार आहे. मात्र, प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीनुसार नियमात शिथिलता आणण्यासाठी त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री 1 जून रोजी जाहीर करतील. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT