death sakal
पुणे

पुणे : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पत्नीकडून सातत्याने खोट्या तक्रारी करून त्रास दिला जात असल्यामुळे तसेच त्यामुळे होणाऱ्या बदनामीला कंटाळून एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी वारजे परिसरात घडली. याप्रकरणी पत्नीविरुद्ध पतीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकाश संभाजी चौघुले (वय ३३) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर स्नेहल प्रकाश चौघुले (वय २८, रा. वारजे) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश यांचे भाऊ गिरीश संभाजी चौघुले (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे.
प्रकाश व स्नेहल यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. दरम्यान, पत्नीने त्यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी दिल्या होत्या. त्यामुळे नातेवाईक व कंपनीमध्ये त्यांची बदनामी झाली होती. या मानसिक त्रासामुळे त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांचे भाऊ गिरीश यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन पत्नी स्नेहल विरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates: इचलकरंजीत पंचगंगा नदीवरील जूना पूल वाहतूकीस बंद

सावली, तारा की ऐश्वर्या कोण मारणार बाजी? 'सावळ्याची जणू सावली'मध्ये रंगणार 'आम्ही सारे खवय्ये'ची मेजवाणी

Shravan Somavar Marathi Wishes 2025: ये भोळ्या शंकराला..! श्रावणी सोमवारनिमित्त मित्रपरिवाला पाठवा मराठीतून भक्तिमय संदेश

Nashik Crime : 'जीएसटी' बनावट सॉफ्टवेअर प्रकरण; देवळालीतील इंजिनिअर ताब्यात, गुप्तचारांची झडती सुरू

Women's Chess World Cup : दिव्या-हंपी पहिला डाव बरोबरीत, महिला विश्वकरंडक बुद्धिबळ; दोघींनीही वर्चस्वाची संधी गमावली

SCROLL FOR NEXT