Man-Housework 
पुणे

पुरुषांनी घरकामात अधिक लक्ष द्यावे; पुणेकर महिलांचे म्हणणे

सकाळवृत्तसेवा

पुणे - घरातील स्वयंपाकातील वेळ वाचवून तुम्हालाही काही तरी करावे असे वाटतंय ना! अहो, अगदी तुमच्याप्रमाणे १० पैकी सहा महिलांना देखील हेच वाटतंय बरं का! जवळपास ४० ते ४५ वर्षे वयोगटातील जवळपास ६१ टक्के महिलांचा बहुतांश वेळ हा घरकाम आणि त्यातही विशेषतः स्वयंपाक आणि मुलांची काळजी घेणे यात जातो. घरकामात पुरुषांचा हातभार लागावा आणि शिल्लक राहणारा वेळ आपल्या आवडीनिवडींच्या कामासाठी वापरणे शक्‍य होईल, असे जवळपास ९४ टक्के महिलांना वाटत असल्याचे समोर आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील १० शहरांमध्ये डिसेंबर २०२०मध्ये केलेल्या सर्वेक्षणात बाराशे प्रतिसादकर्त्यांनी मते नोंदविली आहेत. यात पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर आणि औरंगाबाद या शहरांतील महिलांचा समावेश आहे. गृहिणींच्या आयुष्यावर घरगुती कामांचा कसा परिणाम होतो? आणि त्यांच्या आवडी जोपासण्यासाठी त्यांना पाठिंब्याची कशी गरज आहे?, हे जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले.

‘जेमिनी कुकिंग ऑइल’च्या या सर्वेक्षणानुसार ६० टक्‍क्‍यांहून अधिक महिलांना फक्त गृहिणी न राहता त्यापलीकडे काहीतरी करायचं आहे. पुरुषांनी घरातील कामांमध्ये अधिक लक्ष द्यायला हवे, असे पुण्यातील ९४ टक्के महिलांना वाटते.
कुटुंबाचे आरोग्य आणि पोषण हे सर्वांत महत्त्वाचे आहे, यावर महिलांचा ठाम विश्वास असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. सर्वेक्षणातील ६५ टक्के महिलांना वाटते की, त्यांनी बनवलेले अन्न अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी असते. मात्र, आपल्या महत्त्वाकांक्षा जोपासण्यासाठी त्यांना घरगुती कामांमध्ये जाणारा वेळ कमी करायचा आहे, असे राज्यातील ६० टक्के महिलांनी सांगितले.

नाशिक, सोलापूर आणि पुणे ही तीन शहरे यात आघाडीवर आहेत. या शहरातील महिलांना रोजच्या घरगुती कामांतून ३० मिनिटे जरी अधिक मिळाली तरी स्वतः:ची आवड जपण्यासाठी त्या उत्सुक आहेत, असे या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.

सर्वेक्षणातील निष्कर्ष

  • ८० टक्के महिला स्वयंपाक स्वत:च करतात, त्यांना हा पर्याय आरोग्यदायी वाटतो
  • स्वयंपाक (दर दिवसाला १०० मिनिटे), मुलांचा सांभाळ (दर दिवसाला १३३ मिनिटे) ही सर्वाधिक गुंतवून ठेवणारी कामे
  • सणासुदीत कामे वाढत असल्याचे ९७ टक्के महिलांचे म्हणणे
  • २१ ते २५ वयोगटातील ७४ टक्के महिलांना घरकामात पुरुषांचे साहाय्य मिळते. 
  • हे प्रमाण ठाणे (९९ टक्के), नवी मुंबई (९०), मुंबई (८२) आणि पुणे (८०) असे आहे.
  • १० पैकी ९ महिलांनी घरगुती कामांत पुरुषांनीही समान वाटा उचलावा असे वाटते.
  • राज्यातील ६४ टक्के महिलांनी एकट्या असताना करिअर, आवड, छंद यासाठी मिळाला होता वेळ

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: सूर्यकुमार-शिवम दुबेही मुंबईसाठी खेळणार की नाही? महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Latest Marathi News Live Update : लोकांना जागरूक करण्यात आम्ही अपयशी ठरत आहोत - दलवाई

Bangladesh Hindu Youth Murder Reason : बांगलादेशातील हिंदू तरूणाच्या निर्घृण हत्येमागचे खरे कारण अखेर आले समोर!

Mumbai: राज्यात दोनच विमानतळांना प्रेरणादायी नावे, पण कोणत्या? अहवालातून महत्त्वाची माहिती समोर

Mumbai Water Supply: मुंबईत २२ ते २६ डिसेंबरपर्यंत पाणी संकट! 'या' भागांसाठी बीएमसीकडून महत्त्वाचा इशारा जारी, वाचा यादी...

SCROLL FOR NEXT