office sakal
पुणे

पुणे : दिवाळीनंतर पुन्हा वर्क फॉर्म ऑफिस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी लागू करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊनवेळी सुरू झालेले वर्क फॉर्म आता अनेक आयटी कंपन्यांतील कर्मचा-यांसाठी बंद होत आहे. दिवाळीनंतर पुन्हा आॅफीसमध्ये हजर होण्याची सूचना करणारे मेल कर्मचा-यांना कंपनी व्यवस्थापनाकडून पाठविण्यात आले आहेत.

कर्मचा-यांना पुरविण्यात येणा-या सुविधा तसेच प्रोजेक्टसाठी भाड्यापोटी परदेशातील ग्राहकांकडून आकारण्यात येत असलेले पैसे मिळणे बंद झाल्याने. तसेच कामाचा व्याप वाढत असल्याने आयटीयन्सला पुन्हा कामावर बोलावण्यात येत आहेत, अशी माहिती आयटीमधील कामगार संघटनांकडून देण्यात आली. पुण्यात कामाला असलेले बहुसंख्य आयटीयन्स हे पुण्याच्या बाहेरचे आहेत. वर्क फॉर्म होम असल्याने त्यांच्या मुळ गावातून आॅनलार्इन कामकाज सुरू होते. मात्र आता पुन्हा कामावर बोलाविण्यास सुरवात झाल्याने कर्मचा-यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. घरीच कामाचा सेटअप तयार झाल्याने आता घरूनच काम करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आयटीयन्स करीत आहेत.

याबाबत नेसेन्ट इनफॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी एम्प्लाईज सिनेट (एनआयटीइएस) चे अध्यक्ष हरप्रीत सलुजा यांनी सांगितले की, आऊटसोर्सिंगद्वारे काम करणा-या कंपन्यांचे बिलिंग हे तेथे काम करीत असलेल्या कर्मचारी संख्येवर देखील अवलंबून असते. एखाद्या प्रोजेक्टचे काम करण्यासाठी कर्मचारी आणि भाड्याने घेतलेल्या वस्तूंचे बिल या कंपन्या परदेशात असलेल्या त्यांच्या ग्राहकांना पाठवते. आॅफीस, आॅफीसमधील विविध वस्तू यांचे भाडे ते बिलात जोडत असतात. कर्मचारी घरूनच काम करीत असल्याने त्यांच्यासाठी आवश्‍यक असलेल्या सुविधा कंपनी पुरवीत नाही. मात्र त्याचे पैसे परदेशातील ग्राहकांकडून वसूल करीत आहे. हे पैसे मिळणे आता बंद झाल्याने अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचा-यांना आॅफीसमधून काम करण्यास सांगत आहे.

कंपन्यांच्या नफ्यासाठी कर्मचा-यांची गैरसोय नको :

आॅफीसमध्ये जाऊन काम करावे लागणार असल्याने कर्मचा-यांना पुन्हा पुण्यात यावे लागणार आहे. महिन्यातील आठ दिवस जरी कामावर हजर व्हायचे असेल तर कर्मचा-याला पूर्ण महिन्याचे घरभाडे भरावे लागेल. त्यांचा सर्वच खर्च वाढणार आहे. तसेच सर्वच कर्मचारी पुन्हा कामावर जायला लागले तर कोरोना विषयक नियमांचे पालन करणे मुश्‍कील होर्इल. कंपन्यांच्या नफ्यासाठी ते कर्मचा-यांना पुन्हा बोलावत आहेत. सर्वांना वर्क फॉर्म आॅफीस बंधनकारक नसावे, अशी भूमिका एनआयटीइएसने घेतली आहे.

"१५ नोव्हेंबरपासून कामावर हजर होण्याचा मेल मला कंपनीने पाठवला आहे. मात्र आॅफीसला का बोलविले जात आहे हे, अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. पुन्हा कामाच्या ठिकाणी हजर व्हायचे असेल तर कर्मचा-यांना घरभाडे, आॅफीसला येण्या-जाण्यासाठीचा खर्च वाढणार आहे. त्याचा कंपनीने विचार करावा व सर्वांना आॅफीसला येणे बंधनकारक नसावे."

- आयटी कर्मचारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : जेवणात झुरळ, पिन! COEP च्या मुलींच्या वसतिगृहात मनविसेचे तीव्र आंदोलन; विद्यापीठाला ७२ तासांचे अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: जिल्हा परिषद निवडणुकांची लवकरच घोषणा!

Railway Ticket Booking : रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंग सिस्टीममध्ये केला मोठा बदल!

Eknath Shinde : राळेगणसिद्धीत अण्णा हजारे व उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत बांबू लागवड अभियानाचा शुभारंभ!

Ashish Shelar : ‘वंदे मातरम्’ हे विकसित भारताच्या दिशादर्शनाचे गीत’ आशिष शेलार; ‘ध्यास वंदे मातरम्‌चा’ पुस्तकाचे प्रकाशन

SCROLL FOR NEXT