crime file photo
पुणे

पुणे : अंगावर थुंकल्याच्या रागातून 'त्या' महिलेचा तरुणाने केला खून!

धनकवडीतील महिलेच्या खूनप्रकरणी सहकारनगर पोलिसांकडून तरुणाला अटक

सकाळ डिजिटल टीम

पुणे : धनकवडी (Dhankawadi) येथे सदनिकेत राहणाऱ्या एकट्या महिलेच्या खूनाचा अखेर उलगडा झाला. सहकारनगर पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणाला अटक केली. बिअर बारमध्ये दारु खरेदी केल्यानंतर तेथे काम करणाऱ्या कामगाराच्या अंगावर थुकंल्याच्या रागातून कामगाराने महिलेचा खून केल्याचं निष्पन्न झालं आहे. (Pune young man murdered woman who was spitting on him)

सहकारनगर पोलिसांच्या माहितीनुसार, अविनाश विष्णू साळवे (वय २७, रा. पाटील नगर, धनकवडी) असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. तर कल्पना घोष (वय ३२, रा. धनकवडी) असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे. कल्पना घोष या मुळच्या पश्‍चिम बंगाल येथील होत्या. काही महिन्यांपासून त्या धनकवडीतील एका इमारतीमधील सदनिकेत एकट्याच राहात होत्या. शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह घरामध्ये आढळून आला होता. या प्रकरणाचा सहकारनगर पोलिसांकडून तपास सुरू होता. मात्र, महिलेचा खुन नेमक्‍या कोणत्या कारणामुळे झाला, हे स्पष्ट होत नव्हतं.

दरम्यान, सहकारनगर पोलिसांनी शनिवारी सायंकाळीच धनकवडीतील एका बिअर बारमध्ये काम करणाऱ्या अविनाश साळवे याला ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यानंच खुन केल्याची कबूली दिली. साळवे हा संबंधीत बीअर बारमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत होता आणि तिथेच राहात होता. कल्पना घोषला दारुचं व्यसन होतं. ती साळवेला फोन करून त्याला दमदाटी करून त्याच्याकडून दारु मागवत असे. त्यामुळे साळवेचं तिच्यासोबत अनेकदा भांडणं झाली होती. दोन दिवसांपूर्वी तिने पुन्हा साळवेला शिवीगाळ केली. तसेच त्याच्या अंगावर ती थुंकली याचा राग सहन न झाल्याने साळवेने धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EU takes action against IRGC : युरोपियन युनियनने ‘इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ला दहशतवादी संघटना केलं घोषित!

Arijit Singh Possible to enter in Politics : अरिजीत सिंह राजकारणात करतोय एन्ट्री? ; पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ!

Ajit Pawar : दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांनी अर्पण केली श्रद्धांजली, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठांत शुकशुकाट

Ajit Pawar :...ही दादांची सभा नव्हे दोस्ता, अखेरच्या निरोपाची वेळ आहे! विविध रंगछटा व हास्यमुद्रेतील दादांचे १२ फ्लेक्स पाहून कार्यकर्ते गहिवरले

T20 World Cup 2026 जिंकून सूर्यकुमारच्या नेतृ्त्वात टीम इंडिया इतिहास घडवणार? रवी शास्त्री म्हणाले, '१० मिनिटांचा खेळ...'

SCROLL FOR NEXT