Crime 
पुणे

दारुच्या नशेत तो पोलिसांना म्हणाला, 'मला गाडी पकडून द्या घरी जायचंय'!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मद्यपान केल्यानंतर मद्यपी व्यक्ती कोणाशी भांडेल, याचा काही नेम नाही. पुण्यात भरपूर मद्यपान केलेल्या एका तरुणाने थेट चौकामध्ये वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांशीच पंगा घेतला. एवढेच नाही, तर घरी जाण्यासाठी गाडी पकडून देण्यासाठी मागणी करुन त्याने पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. अखेर पोलिसांनी त्याला उचलून पोलिस ठाण्यात नेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचे 'तारे जमीं पर' येण्यास सुरूवात झाली.

वानवडी वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी रत्नदीप कदम हे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत बुधवारी रात्री आठ वाजता गोळीबार मैदान चौकात वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी प्रशांत धनराज ढवळे (वय 28, रा.सुदर्शननगर, पिंपळे गुरव) हा तेथून जात होता. त्यावेळी तो चौकात थांबलेल्या कदम यांच्याकडे आला. तो कदम यांना 'मला गाडी पकडून दे' असे म्हणाला. तेव्हा त्याने मास्क परिधान केले नसल्याने कदम यांनी त्यास तेथून जाण्यास सांगितले.

मात्र भरपूर मद्यापन केल्याने ढवळे तेथून जाण्यास तयार नव्हता. याउलट त्याने कदम यांच्याशी हुज्जत घालीत त्यांना शिवीगाळ सुरू केली. हा प्रकार पाहून रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरीकांनी त्यास समजावण्याचा प्रयत्न केला. तर त्याने नागरीकांनाही शिवीगाळ, धक्काबुक्की करुन त्यांना मारहाण केली.

दरम्यान, पोलिस त्याला पोलिस ठाण्यात घेऊन जात असतानाही त्याने वाहतूक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरुन सरकारी कामात अडथळा आणला. अखेर पोलिसांनी त्यास पोलिस ठाण्यात नेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson : भाई, दो सेंच्युरी मिस नाही झाल्या... ९७ अन् ८९ धावा केल्यात; संजू सॅमसनची भन्नाट पत्रकार परिषद Video Viral

'ही काय कोंबडीची पिसं...' 'येसूबाई' फेम प्राजक्ता गायकवाड नव्या हेअरस्टाइलमुळे ट्रोल; भावाने घेतली बहिणीची बाजू

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठ्यावर टांगती तलवार

IIT Hyderabad Internship: B.Tech–M.Tech करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! IIT हैदराबादमध्ये SURE इंटर्नशिपसाठी अर्ज सुरू; महिन्याला स्टायपेंडही मिळणार; अशी आहे प्रक्रिया

Iran Missile Strike: इराणने थेट अमेरिकेचा डोळा भेदला! अब्जावधींची क्षेपणास्त्र चेतावणी प्रणाली उद्ध्वस्त, युद्धाला धोकादायक वळण

SCROLL FOR NEXT