Pune ZP CEO Ramesh Chavan sakal
पुणे

Pune ZP CEO : रमेश चव्हाण पुणे झेडपीचे नवे सीईओ; आयुष प्रसाद यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

महसूल विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण यांची पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नियुक्ती करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महसूल विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण यांची पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नियुक्ती करण्यात आली आहे. ते येत्या दोन दिवसात पदभार स्वीकारणार आहेत. आयुष प्रसाद यांची जळगावच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नवे सीईओ चव्हाण यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून बी. एस्सी (ॲग्रिकल्चर) ही पदवी संपादन केली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेद्वारे ते सन १९९६ मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून महसूल सेवेत दाखल झाले.

त्यानंतर त्यांनी सातारा व सोलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी, नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि महसूल विभागात सहसचिव आदी पदांवर काम केले आहे. त्यांची सप्टेंबर २०१९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) निवड झाली आहे.

दरम्यान, आयुष प्रसाद हे २१ जानेवारी २०२० रोजी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रुजू झाले होते. तेव्हापासून त्यांनी सुमारे साडेतीन वर्ष या पदावर काम केले असून, यापैकी सुमारे दीड वर्षे त्यांनी जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: ''आका असो नाहीतर फाका असो..'', अजित पवार असं कुणाला म्हणाले? बाबरी मुंडेंच्या पक्षप्रवेश सोहळ्यात नेमकं काय घडलं?

Gold Rate Today: रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी सोन्याच्या भावात बदल, जाणून घ्या स्वस्त झाले की महाग ?

बॉलिवूड अभिनेत्री Huma Qureshi च्या भावाची निर्घृण हत्या; आसिफवर धारदार शस्त्राने वार, हत्येचा सीसीटीव्ही Video समोर

Kolhapur : माजी शिक्षिका घराच्या कुलपाची चावी भाडेकरूंकडे आणायला गेल्या अन्, पुढं घडलं भयानक

Latest Marathi News Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT