Dagadushet Mandir
Dagadushet Mandir 
पुणे

Coronavirus: पुणेकरांनो सावधान! दगडुशेठ गणपतीच्या दर्शनाला जाताये? मास्क जवळ बाळगा

सकाळ डिजिटल टीम

पुणे : भारतात चीनमधील कोरोनाचा नवा व्हेरियंट BF.7 दाखल झाला आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रानं सर्व राज्यांना कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळं आता पुण्यातील एक गर्दीचं ठिकाणं असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपती देवस्थान प्रशासनानंही याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. (Punekar beware apeal to use Mask at Dagadushet Mandir)

गणेशभक्तांनी दर्शनासाठी येताना मास्क वापरण्याचं आवाहन दगडूशेठ गणपती मंदीर प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. यापार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन तातडीनं गणेशभक्तासांठी ५ हजार मास्क खरेदी करणार आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन भाविकांना करण्यात आलं आहे.

दरम्यान, सध्या मंदीर प्रशासनाच्यावतीनं ज्या भाविकांकडे मास्क नाहीत अशांना मास्कचं मोफत वाटप केलं जात आहेत. त्याचबरोबर मास्क वापरा अशा सूचना मंदिरातील फलकावर लावण्यात आल्या आहेत. याद्वारे मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हे ही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्याबाबत खरबदारीचा उपाय म्हणून पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थान प्रशासनानंतर आता शिर्डी येथील साईबाबा मंदिर देवस्थान आणि पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासह राज्यातील इतर महत्वांच्या मंदिरांमध्येही मास्कसक्ती होण्यीच चिन्हे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Sharan Singh : आता मी खुला सांड... तिकीट नाकारलेल्या ब्रिजभूषणनं कोणाला दिलं आव्हान?

Bhushan Patil: "शिवरायांचा छावा" फेम अभिनेता भूषण पाटील करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; म्हणाला, "मी खूप उत्सुक आहे पण..."

Nashik News : मुंढेगावजवळ गोदान एक्सप्रेसच्या चाकाखालून धुर! प्रवाशांनी घाबरून मारल्या उड्या

Yogi Adityanath : पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना भारतात थारा नाही : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT