Corona
Corona 
पुणे

कोरेगावात अखेर चोरपावलाने कोरोनाचा शिरकाव

शरद पाबळे

कोरेगाव भीमा (पुणे) : पुणे जिल्ह्यात स्वयंस्फूर्तीने सर्वाधिक मोठा लॉकडाउन पाळत आजवर कोरोनाला रोखणाऱ्या शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात अखेर चोरपावलाने कोरोनाचा शिरकाव झाला.

खराडीत नोकरीस असलेल्या कोरेगावातील एका व्यक्तीला श्वसनाचा त्रास झाल्याने २४ तारखेस कोरेगावातील एका खासगी रुग्णालयात व तेथून वाघोलीतील दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान २६ मे रोजी त्याला रुग्णालयातून डिस्चार्जदरम्यान कोरोना तपासणीसाठी त्याचे स्वॅब घेण्यात आले होते. आज कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझीटिव्ह आल्याची बातमी येताच गावात खळबळ उडाली.

पुणे-नगर रस्त्यावर वाघोली, लोणीकंद, सणसवाडी, शिक्रापूर अशा दोन्ही बाजूने कोरोनाचे रुग्ण सापडले असताना कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, पेरणे व नजीकचा परिसर कोरनामुक्त ठेवण्यात स्थानिक ग्रामपंचायती, गाव कारभारी, कृती समित्या व ग्रामस्थांना यश आले होते. शिरूर तालुक्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या कोरेगाव भीमा येथे तर १९ मार्चपासून पुढे ३६ दिवसांचा सर्वात मोठा लॉक डाउन घेतल्याने २५ ते ३० हजार लोकसंख्येच्या गावाला कोरोनापासून संरक्षित ठेवण्यासाठी कृती समितीने प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. मात्र, एवढे करूनही कोरेगाव भीमा येथे आज कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने या सर्व परिश्रमावर पाणी पडल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.

संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी नगर रस्त्यावर तहसीलदार लैला शेख यांच्या आदेशामुळे सुरु झालेल्या चेकनाक्यावरही कडक तपासणीअभावी गावात पंचक्रोशीतील नागरिक गावात येत असल्याने चिंता व्यक्त होत होती. दरम्यान आज कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर तळेगाव ढमढेरे आरोग्य केंद्रातील डॉ. विराज भंडलकर, जालिंदर मारणे व कर्मचाऱ्यांनी परिसरातील सर्वेक्षण सुरू केले असून, कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या सरपंच संगिता कांबळे, उपसरपंच प्रकाश ढेरंगे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी गाव निर्जंतुकीकरण करण्यासह आवश्यक उपाययोजनांच्या कार्यवाहीस सुरुवात केली आहे. कामगार तलाठी अश्विनी कोकाटे व पोलिस पाटील मालन गव्हाणे यांनी परिसराची पाहणी करून गावातील व्यवहार बंद ठेवण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT