पुणे

पुरंदर : जत्रा-यात्रा निमित्ताने बाहेरचं कुणी नकोत; नातेवाईकांवरही कारवाईचा बडगा

श्रीकृष्ण नेवसे

सासवड : पुरंदर तालुक्यात विविध गावांच्या ग्रामदैवतांच्या यात्रा - जत्रा अंतिम टप्प्यात आल्या असल्या तरी दुसऱ्या लाटेतील वाढत्या कोरोना संसर्गाने मोजक्या भक्तांत व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत फक्त धार्मिक विधी उरकला जात आहे. पोलीसांनी बजावल्याने प्रत्येक गावचे पोलीस पाटील यात्रा - जत्रा आणि इतर कसल्याही घरगुती धार्मिक वा इतर कार्यक्रमासही नातेवाईक, मित्र मंडळी येणार नाहीत याची दक्षता घेत आहेत. एवढेच नाही, तर त्यासाठी गावकऱ्यांपुढे दंडात्मक कारवाईचा नोटीशीद्वारे बडगा उचलला आहे.

सासवड (ता. पुरंदर) येथील पोलीस ठाण्याचा गुप्त विभाग त्यासाठी ज्या गावची यात्रा - जत्रा असेल त्यांचा नोटीस बजावल्याचा अहवाल नित्यपणे घेताना दिसत आहे. त्यापुढे जाऊन पोलीस यंत्रणेने महसूल विभागाच्या आदेशाने संसर्ग वाढत असल्याने प्रत्येक गावांत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, शासकीय कर्मचारी, नर्स, आशा सेविका आदींना समवेत घेऊन `ग्राम संनियंत्रण समिती` स्थापन करण्यावर जोर दिला आहे. जवळपास 80 टक्के गावांत अशा समित्या संसर्गावर नियंत्रण मिळविणे, स्वच्छता, बाधीत वा हायरीस्क लोकांचे विलगीकरण, असे लोक न फिरणे, संशयास्पद रुग्णांच्या स्थानिक पातळीवर तपासण्या, चाचणीला पुढे पाठविणे, विविध फवारण्या, जागृती आदींसाठी स्थापल्या आहेत. बाकी गावांत दोन दिवसांत समित्या स्थापून कार्यरत होतील. याचा अहवाल महसूल व पोलीसांच्या जिल्हा यंत्रणेसही दिला जाणार आहे असे पोलीस ठाण्यातून गुप्त वार्ता विभागचे लियाकत मुजावर यांनी सांगितले.

पुरंदर तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब झेंडे यांनी यानिमित्ताने सांगितले की पोलीस यंत्रणेने प्रत्येक गावच्या पोलीस पाटील पदावरील जबाबदार लोकांना गावच्या परीसरात बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे यात्रा, जत्रेपुरतेच नाही.. तर इतर वेळीही बाहेरगावचे कोण लोक कोणाकडे येतात. गाव व परीसरात फिरतात, लोकांमध्ये मिसळतात. कोरोनाची त्रिसूत्री कुठे वापरली जात नाही, व्यावसायिक अस्थापना दिलेल्या वेळेनंतर सुरु असतील तर लक्ष घालणे आदी बाबींवर गाव कारभाऱ्यांना बरोबर घेऊन काम करणे अपेक्षित आहे. तसे पोलीस ठाण्याच्या बैठकीत बजावले आहे.

पोलीस पाटील 5 दिवसाचे वेतन देणार

कोविडच्या कामी पोलीस पाटील आपले पाच दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार आहेत. त्याकरीता तालुक्यातील सर्व गावांचे पोलीस पाटील संमतीपत्र भरुन पोलीस ठाण्यात जमा करीत आहेत असे पुरंदर तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब झेंडे यांनी आज सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SCROLL FOR NEXT