purandar update hills of Pangare ghat fire deforestation with biodiversity pune sakal
पुणे

पांगारे घाटातील डोंगर वणव्यात होरपळले

जैवविविधतेचे सह जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वणवा लावणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

परिंचे : पांगारे ( ता.पुरंदर) घाटात खाजगी क्षेत्रात लागलेल्या वणव्यात डोंगर होरपळून निघाले आहेत. जैवविविधतेचे सह जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वणवा लावणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे पुरंदर तालुका वन परिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण यांनी सांगितले आहे.बुधवारी व गुरुवारी (दि.२८) रोजी सकाळी पांगारे घाटातील खाजगी क्षेत्रातील जमिनीवर अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने ती आग घाटातील वनक्षेत्रात लागली आहे. सकाळी ११ वाजता या आगीने रौद्र रूप धारण केले होते.वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून वन क्षेत्र आगीपासून वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परिसराची पाहणी केली असता पांगारे,हरगुडे, सटलवाडी, मांढर, पाणवडी या परिसरातील डोंगर मोठ्या प्रमाणात वणव्यामुळे होरपळून निघाले आहेत.

पांगारे घाट परिसरात रानडुक्कर, हरिण, लाडगे,ससे, बिबट्या आदी प्राणी तसेच मोर व वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात वणव्या मुळे या प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वन विभागाच्या वतीने अनेक ठिकाणी आगी पासून वन क्षेत्र संरक्षण करण्यासाठी जाळ रेषा काढल्या आहेत. परिसरातील शेतकरी खाजगी क्षेत्रात आग लावत असून त्याचा फटका वन विभागाला बसत असल्याचे वनरक्षक गणेश तांबे यांनी सांगितले आहे.वन विभागाच्या वतीने डोंगराच्या शेजारी असलेल्या गावांमध्ये वणव्या विषयी जागृती करण्यात येत वणवा लागू नये यासाठी घेण्यात येणारी काळजी, वणव्याचे दुष्परिणाम या विषयावर माहिती देण्यात आली असल्याचे वन रक्षक परमेश्वर वाघमारे यांनी सांगितले आहे.

नागरिकांनी मालकी क्षेत्रात वणवा लावू नये. सदरील क्षेत्रातील वणवा फॉरेस्ट मधे येउन वनातील वनउपज वन्यजीव , वृक्ष , पाणी, जमिनिचा पोत यांचा रहास होत होतो. वन वणवा लावणे है दंडनीय गुन्हा असून भारतीय वैन अधिनियम १९२७ चे कलम २६(१) ब आणि क अन्वय पाच हजार रुपये दंड / नुकसानी किंमत व दोन वर्ष कारावासाची शिक्षा आहे. वणवा विझविन्यासाठी नागरिकांनी मदत करणे कायदेशीर कर्त्यव्य पुरंदर वन परिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT