Auto_Industry 
पुणे

कोरोनाच्या तडाख्यातून ऑटो इंडस्ट्री सावरतेय; वाहन खरेदीचा वेग वाढला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना आणि लॉकडाउनमधून वाहन उद्योग हळूहळू सावरू लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत वाहन खरेदी कमी होत झाली असली तरी, आता गेल्या महिन्यापासून दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या खरेदीला आता वेग येऊ लागला आहे. पूर्वीच्या तुलनेत सुमारे 60 टक्‍क्‍यांपर्यंत वाहन उद्योग पोचला आहे.

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे 25 मार्चपासून सुमारे चार महिने वाहन वितरण क्षेत्र बंद होते. जुलैमध्ये काही प्रमाणात वाहन उद्योग कार्यान्वित झाला; परंतु, 13 ते 23 जुलै दरम्यानच्या लॉकडाउनमुळे सुरू झालेल्या वाहन उद्योगाला पुन्हा खीळ बसली. अन्य राज्यांच्या तुलनेत पुण्यात वाहनांच्या खरेदीचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातच अनेक राष्ट्रीयकृत बॅंकांनी, वित्त संस्थांनी अगदी 8 टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्याच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना वाहन खरेदीसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

तसेच चार महिने वाहन उद्योगावर मर्यादा असल्यामुळे आता उत्पादक कंपन्यांनीही अनेक नव्या योजना लागू केल्या आहेत. तसेच सार्वजनिक वाहतूक अद्याप बंद आहे. तसेच ग्राहकही आता वैयक्तिक वाहनाच्या वापरावर भर देऊ लागले आहेत, असे निरीक्षण कोठारी ह्युदाईचे संचालक राजेंद्र कोठारी यांनी नोंदविले. नव्या वाहनांच्या खरेदीरबरोबरच जुनी वाहने दुरुस्तीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सेल्स अँड सर्व्हिसचा उद्योग विस्तारत आहे. ग्राहकही आता घराबाहेर पडून त्याचे रूटीन सुरू करू लागला आहे. त्यामुळे गणेशोत्सव - दिवाळीमध्ये वाहनांची खरेदी वाढेल, अशी अपेक्षा पाषाणकर ऑटोमोबाईल्सचे संचालक सागर पाषाणकर यांनी व्यक्त केली.

या बाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, "गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहन खरेदी कमी झाल्याचे दिसत असले तरी, लॉकडाउनच्या संकटातून वाहन उद्योग आता सावरू लागला आहे. सध्याचा काळ आव्हानात्मक असला तरी, नागरिक त्यांचा कामधंदा, व्यवसाय मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत वाहन क्षेत्राला काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल.''

वाहनाचा प्रकार 18 मे ते 13 ऑगस्ट 2019 18 मे ते 13 ऑगस्ट 2020
मोटारसायकल 33 हजार 643 10 हजार 269
मोटारी 9 हजार 709 5 हजार 173
रिक्षा 2 हजार 835 511
मालवाहतूक 2 हजार 119 496
कॅब, टॅक्‍सी 945 62
इतर वाहने 1040 437 

नोंदणीतून आरटीओला मिळालेला महसूल 

- 158 कोटी 89 लाख (18 मे ते 13 ऑगस्ट 2019)

- 70 कोटी 75 लाख (18 मे ते 13 ऑगस्ट 2020)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT