Supriya Sule Sakal
पुणे

गंभीर प्रश्न बाजूला ठेवत हल्ली पेन ड्राईव्हचे फॅड - सुप्रिया सुळे

राज्य आणि देशापुढे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत, असे असताना केंद्रातील सरकार व राज्यातील विरोधी पक्ष महागाईच्या मुद्यापासून लपत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

राज्य आणि देशापुढे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत, असे असताना केंद्रातील सरकार व राज्यातील विरोधी पक्ष महागाईच्या मुद्यापासून लपत आहेत.

बारामती - राज्य आणि देशापुढे अनेक महत्वाचे प्रश्न (Important Question) आहेत, असे असताना केंद्रातील सरकार (Central Government) व राज्यातील विरोधी पक्ष महागाईच्या मुद्यापासून लपत आहेत, गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन हल्ली पेन ड्राईव्हचे नवीन फॅड सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणारे असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. बारामतीत माध्यमांशी त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ईडी किंवा सीबीआयच्या कारवाई संदर्भात राज्यातील काही नेते अगोदरच बोलतात या बाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत माझ्या प्रश्नाला उत्तर दिलेले आहे, कुणीही आयुष्यभर सत्तेत नसते, नियम कायदे बनविले जातात, विरोधकांना त्रास व्हावा या साठी सत्तेचा गैरवापर होऊ नये, असा प्रयत्न सर्वांनी करावा, सूडाचे राजकारण या देशात या पूर्वी कधीच नव्हत, मात्र सातत्याने सध्या ते दिसतय, दुर्देवाने देशासमोरचे महत्वाचे विषय असलेल्या महागाई, इंधनदरवाढ, बेरोजगार या कोविडमुळे निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देत त्या वर मात करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. आरोप प्रत्यारोप करण्यासाठी निवडणूका आहेत.

काळाची गरज ओळखून देश आणखी कसा पुढे जाईल, सामान्य जनतेला इंधन दरवाढीपासून दिलासा कसा देता येईल, हे बघणे जास्त महत्वाचे असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

विकासाचे बारामती मॉडेल पाहण्यासाठी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजना बारामतीत कशा राबविल्या गेल्या आहेत हे पाहण्यासाठी सर्व पक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ बारामतीला दोन दिवस भेट देऊन गेल्याचीही माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. त्यांचा मतदारसंघ व बारामती मतदारसंघात योजनांसह इतर काही चांगल्या गोष्टींचे आदानप्रदान होऊ शकते का या बाबत या दौ-यात खासदारांनी चाचपणी केली असल्याचेही त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad: ''गौरव मोरेसुद्धा घाबरलेला'', प्रवीण गायकवाडांचा धक्कादायक खुलासा

Latest Maharashtra News Updates : 'प्रधानमंत्री धन-धनय कृषी योजने' ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांच्याबाबत रिट्विट केल्याप्रकरणी व्यापारी अटकेत

Kamika Ekadashi 2025: कधी आहे कामिका एकादशी? जाणून घ्या तारिख, तिथी आणि या दिवसाचे महत्त्व

Virat Kohli-Rohit Sharma: 'विराट-रोहितची कमी भासते, पण BCCI ची पॉलिसी आहे की...' उपाध्यक्षांनी दिली महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT