NCP Esakal
पुणे

NCP: राजकारण बाजूला ठेवत नणंद भावजय एकत्र! शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला सुनेत्रा पवार-सुप्रिया सुळेंचं एकत्र फोटो सेशन चर्चेत

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील इतर सदस्यही एकाच व्यासपीठावर असणार आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील इतर सदस्यही एकाच व्यासपीठावर असणार आहेत. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेने उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या वास्तूचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच हे नेते या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येत आहेत. त्यामुळं या कार्यक्रमाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. अशातच राजकारण बाजूला ठेवत नणंद भावजय एकत्र दिसून आल्या. शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्र फोटो सेशन केलं आहे. दौंड तालुक्यातील अनंतराव पवार शाळेच्या नवीन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्याला दोघी एकत्रित दिसून आल्या

दरम्यान पक्ष फूटीपासून बारामती लोकसभा मतदार संघातून आगामी निवडणुकीत शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार लढणार असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान राजकीय मतभेद सोडून नणंद भावजय एकत्र दिसून आल्या.

पवार काका-पुतणे एका मंचावर आले तरी शेजारी बसणार नाहीत

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मौजे चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कुलच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमाला शरद पवार आणि अजित पवार हे दोघे ही एकत्र आहेत. मात्र ज्या स्टेजवर आज हे नेते एकत्र येणार आहेत तिथल्या आसनव्यवस्थेचा क्रम बरचं काही सांगून जातोय.

खुर्च्यांवर कोण कुठे बसणार त्यानुसार नावांच्या पट्ट्या चिटकवण्यात आल्या आहेत. पवार काका पुतणे या कार्यक्रमात शेजारी शेजारी बसतील असे वाटत होते. स्टेजवर बसून ते एकमेकांना बोलतात का याची उत्सुकता होती. मात्र, दोघांच्या मधे प्रतिभा पवार यांची खुर्ची ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे. प्रतिभा पवार यांच्या उजवीकडे शरद पवार बसतील तर डावीकडे अजित पवार बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT