The quarantine family facing problem after their Neighbors found coronaVirus Affected in pune 
पुणे

धक्कादायक : कोरोनाची बाधा शेजाऱ्यांना त्यांचे मात्र, सिंहगड कॉलेजमध्ये हाल

सकाळवृत्तसेवा

पुणे : आमच्या घरासमोरील कुटुंब कोरोनाबाधित सापडल्याने आम्हाला वडगावमधील सिंहगड कॉलेजमध्ये हलविले. पण तेथे ना स्वच्छता आहे ना पुरेशा जेवणाची व्यवस्था. काल तर आमलेले जेवण देण्यात आले...बालगंधर्व रंगमंदिर येथे बॅकस्टेज कलाकार म्हणून काम करणाऱ्या एका कलाकाराची ही व्यथा आहे. ते शिवाजीनगर परिसरात राहतात. परंतु त्यांच्या घरासमोरील कुटुंबातील काहीजण कोरोनाबाधित झाल्याने त्यांचे आणि त्यांच्या शेजारची दोन कुटुंबे यांना गेल्या आठ दिवसांपासून वडगाव बुद्रूक येथील सिंहगड काॅलेज येथे पन्हाळा हाॅस्टेल येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे.


ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'सकाळ'ने या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला. ते  म्हणाले, "आमचे येथे जेवणाचे खूप हाल सुरू आहेत. आमलेले जेवण येते. काल रात्री तर बारा वाजता काही तरुणांनी आम्हाला जेवण बनवून दिले. गेली आठ दिवस आम्ही ज्या खोलीत राहत आहोत, तिथे झाडूसुद्धा मारायला कोणी आलेले नाही. चहा, नाश्ता, जेवण घ्यायला खाली एका खोलीत बोलावतात. तेथे रांग लावून ते घ्यावे लागते. त्यात कोण कोरोना पॉझिटिव्ह आहे का, निगेटिव्ह आहे, हेही कळत नाही.

Coronavirus : पुण्यातून कोरोनाचा होऊ शकतो नायनाट; पण...

प्रशासनाने याची दखल घ्यावी. अन्यथा गर्दीमुळे जे बाधित नाहीत, त्यांनासुद्धा लागण होण्याची शक्यता आहे. आम्ही सुमारे दोनशे लोक या ठिकाणी आहोत, त्यात वृद्धांची संख्या बरीच आहे. त्यांनी मोठा धोका आहे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT