RVO 
पुणे

दृष्टी सुधारत नाही, तर इंजेक्‍शन का घेऊ; नेत्ररोगाच्या रुग्णांना पडलेला प्रश्‍न

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘दृष्टी सुधारत नाही, तर इंजेक्‍शन का घेऊ,’ हा ‘रेटिनल व्हेन ऑक्‍लुजन’ (आरव्हीओ) या नेत्ररोगाच्या रुग्णांना पडलेला मूलभूत प्रश्‍न असतो. त्यामुळे रुग्ण इंजेक्‍शन घेणे टाळतात आणि प्रत्येक दिवशी कणाकणाने ते कायमस्वरूपी अंधत्वाकडे स्वतःला ढकलतात. हा निष्कर्ष राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासातून निघाला आहे.

‘दृष्टी सुधारतच नाही, तर उपचार का घ्यायचे’ हा रुग्णांच्या मनातील गैरसमज हाच ‘आरव्हीओ’मुळे येणाऱ्या अंधत्वामागचं मुख्य कारण आहे. परंतु, रुग्णांना माहिती नसतं की, हे उपचार नियमित सुरू न ठेवल्यास असणारी दृष्टीदेखील जाणार आहे. या बाबत नेमकी स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘आरव्हीओ’चा पहिला देशव्यापी अभ्यास केला. आतापर्यंत हा अभ्यास एखाद्या रुग्णालयापुरता केला होता. परंतु, बहुकेंद्री अभ्यास आहे. पुण्यातील ‘एनआयओ’सह हैदराबाद, कोलकता, नोईडा, त्रिवेंद्रम, बंगळूर आणि चेन्नई देशातील नेत्ररुग्णालयांमध्ये ‘आरव्हीओ’ या आजारावर एकत्रित अभ्यास करण्यात आला. त्यातून हा निष्कर्ष निघाला. या बाबतचा शोधनिबंध ‘बायो मेड सेंट्रल’ (बीएमसी) या ब्रिटिश नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘आरव्हीओ’ या नेत्रविकारात डोळ्यांना पडद्याला रक्तपुरवठा करणारी मुख्य रक्तवाहिनीची कार्यक्षमता कमी होते. वयाची साठी ओलांडलेल्या आणि रक्तदाब, मधुमेह, ‘बी-१२’चं कमी झालेलं प्रमाण हे त्यामागची प्रमुख कारणे आहेत. डोळ्याच्या आतील रक्तवाहिन्यांना आतून सूज आल्याने त्या बंद पडण्याची शक्‍यता असते. हे ‘आरव्हीओ’मागील प्रमुख कारण असते. मात्र, हा अभ्यास फक्त ६० वर्षांच्या पुढील रुग्णांवर केला होता. रक्तदाब, मधुमेहामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे तयार होतात, अशांचा अभ्यास यात करण्यात आला, असे ‘एनआयओ’चे नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर यांनी ‘सकाळ’ला सांगितले.  

ते म्हणाले, ‘हा ‘रिअल वर्ल्ड स्टडी’ आहे. इंजेक्‍शनच्या प्रोटोकॉलप्रमाणे रुग्णांवर उपचार करण्याचा प्रयत्न होतो. परंतु, हे उपचार घेण्यात रुग्णांना मोठे अडथळे असतात. त्यामुळे, हे नेत्रोपचार पूर्ण करू शकत नाहीत.’

काय गुंतागुंत होते?
‘आरव्हीओ’मुळे डोळ्यातील मुख्य रक्तवाहिनी बंद पडते. त्यातून डोळ्याच्या पडद्यावर सूज येते. या सुजेमुळे रुग्णाची दृष्टी कमी होते. ही सूज कमी करण्यासाठी डोळ्यात नियमित इंजेक्‍शन घेणे आवश्‍यक असते. सुरवातीला दर महिन्याला तीन या प्रमाणे इंजेक्‍शन रुग्णाला घ्यावे लागते. त्यानंतर या इंजेक्‍शनमधील अंतर वाढविले जाते. हे उपचार प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार पुढे सुरू ठेवावे लागतात, असेही डॉ. केळकर यांनी स्पष्ट केले.

रुग्ण का सोडतात उपचार?

  • दृष्टी सुधारत नाही
  • रुग्णालयात येण्या-जाण्याच्या अडचणी
  • उपचारासाठी पैसे नाहीत

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT