question on vegetables stock due to coronavirus in Pune  
पुणे

Coronavirus : कोरोनाच्या धास्तीने नागरिकांची रविवारी मार्केडयार्डात गर्दी

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड (पुणे) : कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर भविष्यात काय होईल हे सांगत येत नसल्याने नागरिकांनी आठवड्याचा बाजार करण्यासाठी रविवारी मार्केट यार्डात गर्दी केली होती. तरकारी विभागात मागील दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी फळभाज्या आणि पालेभाज्यांची मागणी वाढली. हातगाड्यांवर पालेभाज्या विकणाऱ्यांकडून नागरिक मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसले.

दरम्यान, फळबाजारातही ग्राहकांची संख्या कमी झाल्याने पेरू, कलिंगड, खरबूज, लिंबे आणि सफरचंदाच्या भावात घट झाली; तसेच भुसार विभागात किराणा भुसार मालाची मागणी घटली आहे. यामुळे शेंगदाणे, बेसन, भाजकी डाळ, रवा, मैदा, आटा, साबुदाणा, सोयाबीन, पाम आणि सूर्यफूल तेलाचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत घटले आहेत.

सरकारने मॉल बंद करण्याचा आदेश दिल्याने मॉल चालकांकडून होणारी खरेदीदेखील बंद झाली आहे. हॉटेल व्यावसायिकांकडून होणारी मागणी 60 ते 70 टक्‍क्‍यांनी कमी झाली; तसेच बाजारातून चांगला माल खरेदी करून तो माल व्यवस्थित पॅक करून निर्यात करणारे अनेक व्यापारी आहेत; परंतु सध्या अनेक देशांतील निर्यात बंद आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. यामुळे बाजारात तुलनेने मागणी घटली आहे.

कोरोनामुळे परिस्थिती अजून बिकट होईल. यामुळे सध्या ग्राहक माल खरेदी करून साठवूनदेखील ठेवत आहेत. यंदा पाऊस जास्त झाला आहे; तसेच मुबलक पाणी असल्याने उत्पन्नही जास्त आहे. यामुळे भाज्यांचे भाव कमी आहेत.
- विलास भुजबळ, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन

सर्व प्रकारच्या फुलांच्या भावात 50 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. फुलांना मुंबई बाजारात मागणी कमी असल्याने तेथील काही गाड्या बाजारात आल्या होत्या. त्यामुळे फुलांची अवाक मोठी होती. तसेच ग्राहकांची संख्या सुमारे 30 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. यामुळे भावात मोठी घसरण झाली.
- अरुण वीर, अध्यक्ष, फुलबाजार संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिर गाभारा दर्शन चार दिवस राहणार बंद; मंदिर प्रशासनाकडून माहिती

Latest Marathi News Live Update : नगर-श्रीगोंदा मार्गांवर तेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात

'शुभविवाह' मालिकेतील अभिनेत्रीचा बदललेला लूक पाहून चाहते थक्क; आजार की आणखी काही?

Pune Municipal Corporation: कनिष्ठ अभियंत्यांच्या भरती रखडल्याने महापालिका ‘टुलीप’ इंटर्नशिपवर अवलंबून

SCROLL FOR NEXT