evm.jpg
evm.jpg 
पुणे

Vidhan Sabha 2019 : ​पुण्यात मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल; केंद्राच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह 

सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 : पुणे : पुण्यातील मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मतदार मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे आणि पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना मतदान केल्याचे सध्या व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. 

मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल होऊ नयेत यासाठी निवडणूक आयोगाने यापूर्वीच वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. मतदान करताना मोबाईलजवळ बाळगण्यास बंदी घातली आहे. परंतु, असे असूनही ही काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये  मतदान करतानाचे हे व्हिडिओ शूट केले आणि त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. 

अनेक मतदान केंद्रांवर पोलिसांनीही मोबाईल बंदी घातली आहे परंतू काही अति उत्साही कार्यकर्ते पोलिसांची नजर चुकवून मोबाईल मतदान केंद्राच्या आत घेऊन जात आहेत. यातून या मोबाईल बंदीचा फारसा काही फायदा झाला नसल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हैदराबादला दुसरा धक्का! मुंबईकडून पहिला सामना खेळणाऱ्या अंशुलने उडवला मयंक अग्रवालचा त्रिफळा

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Latest Marathi News Update: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT