Theaters  sakal
पुणे

Nilu Phule krutadnyata Samman : नाट्यगृह संवर्धनाबाबत उदासीनता ;सुमीत राघवन ,दुरवस्थेसाठी प्रेक्षक आणि कलाकार हे दोघेही दोषी

‘‘आपल्याकडे नाट्यगृहांची अवस्था फार चांगली नाही. रंगभूमीविषयी आस्था असणारी नाट्यगृहे दिसत नाहीत. परदेशातील नाट्यगृहे पाहून मात्र अवाक् व्हायला होते. पाश्‍चात्य देशांत पुनर्बांधणी नाही, तर संवर्धन महत्त्वाचे मानले जाते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘आपल्याकडे नाट्यगृहांची अवस्था फार चांगली नाही. रंगभूमीविषयी आस्था असणारी नाट्यगृहे दिसत नाहीत. परदेशातील नाट्यगृहे पाहून मात्र अवाक् व्हायला होते. पाश्‍चात्य देशांत पुनर्बांधणी नाही, तर संवर्धन महत्त्वाचे मानले जाते. आपल्याकडे त्याबद्दल उदासीनता आहे. नाट्यगृहांच्या या अवस्थेला प्रेक्षक आणि कलाकार हे दोघेही दोषी आहेत,’’ असे परखड मत अभिनेते सुमीत राघवन यांनी रविवारी व्यक्त केले.

निळू फुले यांचे कुटुंबीय आणि बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्यातर्फे कलारंग महोत्सवात राघवन यांना ‘निळू फुले कृतज्ञता सन्मान’ यांना प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. गतवर्षीच्या सन्मानाचे मानकरी अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते राघवन यांना गौरवण्यात आले. सन्मानाचे हे दुसरे वर्ष असून, रोख रुपये २१ हजार, उपरणे, गांधी टोपी आणि रोप, असे या सन्मानाचे स्वरूप होते. याप्रसंगी बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष समीर बेलवलकर, निळू फुले यांच्या कन्या आणि अभिनेत्री गार्गी फुले-थत्ते, राजेश दामले आदी उपस्थित होते.

राघवन म्हणाले, ‘‘आज मराठीत अनेक माईलस्टोन नाटके आहेत आणि असे प्रयोग चालू रहायला हवेत. लोककला टिकवायची असेल तर लोककलाकार आणि आजचे व्यावसायिक नट यांना एकत्र घेत लोकनाट्ये व्हावीत.’’ पुरस्काराविषयी ते म्हणाले, ‘‘कलाकाराव्यतिरिक्त माणूस म्हणून आपण काय करतो आहोत, याचे भान राखण्याचा प्रयत्न मी कायम करतो. त्याचीच पावती या पुरस्काराने मिळाली. निळू फुले यांची भेट झाली नाही किंवा त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही. मात्र, निळू भाऊ हे ‘साराभाई वर्सेस साराभाई’ ही मालिका आवडीने पाहायचे, हे आज कळल्यानंतर मला मूठभर मांस चढले आहे.’’

सचिन खेडेकर म्हणाले, ‘‘आज प्रेक्षकांना जिवंत कला पाहण्याची नशा आहे. त्यामुळे नाटक पाहणारे प्रेक्षक हे चित्रपटाला जाणाऱ्या प्रेक्षकांपेक्षा अधिक असतात. कलाकाराने प्रेक्षकाभिमुख काम करायला हवे. कलाकाराने कलाकार म्हणून मेहनत घ्यायला हवीच, शिवाय त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक चांगला माणूस म्हणून सामाजिक भान जपण्यावरही भर द्यायला हवा.’’

कार्यक्रमाची सुरुवात ‘एका पावसात’ या विशेष कार्यक्रमाने झाली. यामध्ये गार्गी फुले-थत्ते आणि कवी, गीतकार वैभव जोशी यांचा कवितांचा कार्यक्रम सादर झाला. उत्तरार्धात निवेदक राजेश दामले यांनी राघवन यांची मुलाखत घेतली. समीर बेलवलकर यांनी प्रास्ताविक केले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धी कुलकर्णी यांनी आभार मानले.

मराठी चित्रपटांवर भागत नाही

‘‘मराठी चित्रपटांवर नटाचे पोट भागू शकत नाही. त्यामुळे त्यांना बाहेर पडून वेब सिरीज आणि मालिका कराव्याच लागतील,’’ अशी वस्तुस्थिती सुमीत राघवन यांनी मांडली. तसेच, ‘‘आज इन्स्टाग्रामचे फॉलोअर्स किती आहेत, यावर कलाकाराला मुख्य भूमिका मिळते, ही त्रासदायक गोष्ट आहे,’’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Chandrapur News : पतीचं दुखणं बरं होईना, जमापुंजीही संपली; बिल कसं भरायचं? पैसे नसल्यानं पत्नीनं रुग्णालयातच संपवलं जीवन

Solapur News: 'बेपत्ता रिक्षाचालकाचा ‘सीडीआर’वरून शोध'; दुसऱ्या दिवशीही सापडला नाही, जुना पूना नाका ते देगाव ब्रीजपर्यंत शोधले

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT